2 मुलींनी हद्दच केली! होळीचा सण पडला लय ‘भारी’, पोलिसांची मोठी कारवाई, Video

Holi | सोमवारी देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण होळीच्या रंगात न्हाऊन निघाले. सेलिब्रेटींनी देखील होळीच्या सणाचा आनंद लुटला. प्रत्येकजण रंगात रंगलेल्या अवस्थेत फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. (Holi Video) आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही देखील डोक्याला हात लावाल. दोन तरूणींची भररस्त्यात सुरू असलेली अश्लीलता पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. (Holi celebration)

हे सोशल मीडियाचे जग आहे, इथे प्रसिद्धीसाठी कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना न केलेलीच बरी. होळीच्या रंगात रंगलेल्या या दोन तरूणींनी स्कूटीवर भलताच स्टंट केला. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी चालू गाडीवर अश्लील कृत्य करत सर्वांचे लक्ष वेधले.

2 मुलींची अश्लीलता!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन तरूणी आणि एक तरूण स्कूटीवरून प्रवास करत आहेत. तरूण गाडी चालवत आहे. तर एक तरूणी उलट्या दिशेने बसून दुसऱ्या तरूणीसोबत होळी खेळत आहे. त्यांचे अश्लील हावभाव टीकाकारांना आमंत्रण देणारे आहेत.

दुसऱ्या व्हिडीओत तर एक तरूणी स्कूटीवर उभी राहते पण अचानक तोल गेल्याने ती खाली पडते. या व्हिडीओत दिसणारा तरूण हा वेगळा असून ती स्कूटी देखील वेगळी आहे. संबंधित तरूणी स्कूटीवर उभी राहून चालक तरूणाला रंग लावते आणि नृत्य करताना ती अचानक खाली कोसळते.

 

Holi पडली लय ‘भारी’

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची स्थानिक पोलिसांनी दखल घेतली आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 33 हजार रूपयांचे चालान कापले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अश्लीलता पसरवणाऱ्या दोन तरूणींना होळीचा सण लय भारी पडला. मागील काही काळापासून अशा व्हिडीओ सातत्याने समोर येत आहेत. मेट्रो असो की मग रेल्वे… प्रसिद्धीसाठी तरूणाई कुठेही थिरकताना दिसत आहे.

News Title- A video of two girl from Uttar Pradesh’s Noida spreading obscenity while celebrating Holi is going viral on social media
महत्त्वाच्या बातम्या –

अजित पवार यांच्या डोकेदुखीत वाढ; पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य विरोधात

सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

वाचनीय: CSK त ऋतु’राज’! मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत; पण पांड्या ‘लक्ष्य’ का?

‘या’ राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार!

विराटने पुन्हा दाखवून दिलं; भर मैदानात व्हिडिओ कॉलवर दिला फ्लाइंग किस