विराटने पुन्हा दाखवून दिलं; भर मैदानात व्हिडिओ कॉलवर दिला फ्लाइंग किस

Virat Kohli Video Calls Anushka Sharma l काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने IPL 2024 मध्ये पहिला विजय मिळाला आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी बेंगळुरूने पंजाब किंग्जचा घरच्या मैदानावर चार गडी राखून पराभव केला आहे. यजमान संघाच्या या विजयात विराट कोहलीच महत्त्वाच योगदान आहे. तसेच या सामन्यात कोहलीने 77 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली आहे. अशातच विराट कोहली काल झालेल्या सामन्यादरम्यान चांगलाच चर्चेत आला आहे. कारण काल सामना संपल्यानंतर कोहलीने भर मैदानावर त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला आहे.

Virat Kohli Video Calls Anushka Sharma l विराटचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल :

व्हिडीओ कॉल दरम्यान विराटने पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस देखील दिला आहे. तसेच कोहलीला त्याच्या या मॅचविनिंग इनिंगसाठी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. कोहली नुकताच दुसऱ्यांदा वडील झाला आहे. पत्नी अनुष्काने एका मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव अकाय आहे.

व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर कोहली व्हिडिओवर त्याच्या कुटुंबीयांशी बोलताना दिसत आहे. त्यामुळे विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कोहली पत्नी अनुष्का तसेच मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्याशी बोलत आहे. यावेळी कोहलीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. व्हिडीओ कॉलवर तो वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन देत होता. कधी तो पत्नी अनुष्काला फ्लाइंग किस देताना दिसला तर कधी तो मुलासोबत खेळत असल्याचे दिसले आहे.

विराटच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष :

मुलाच्या जन्मामुळे कोहली जवळपास दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. त्याने या वर्षी जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा T20 सामना खेळला होता, जो सुमारे 14 महिन्यांनंतर त्याचा पहिला T20I सामना होता. कोहलीने गेल्या टी-20 विश्वचषकापासून फार कमी टी-20 सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत कोहलीला आयपीएल 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

News Title : Virat Kohli Video Calls Anushka Sharma

महत्त्वाच्या बातम्या- 

ऐश्वर्याने अखेर मौन सोडलं, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा!

“आम्ही फक्त लढाई हरलोय पण…”, गब्बर धवनने रणशिंग फुंकले!

कोहलीसाठी काहीपण! चाहत्याने भर मैदानात केलं असं काही की प्रेक्षक पाहतच राहिले

विराट ‘नंबर वन’! किंग कोहलीची ऐतिहासिक खेळी, ठरला पहिला भारतीय

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?