ऐश्वर्याने अखेर मौन सोडलं, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा!

Aishwarya Sharma | बिग बाॅस 17 फेम अभिनेत्री ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. फार कमी वेळात ऐश्वर्याने आपलं नाव गाजवलं. बिग बाॅस 17 मधून ती झळकली होती. सोशल मीडियावर सुद्धा ऐश्वर्याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. आपल्या चाहत्यांसाठी तसंच नेटकऱ्यांसाठी ती नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. मात्र दोन दिवसांपूर्वी ऐश्वर्या गुड न्यूज देणार असल्याच्या चर्चांना अक्षरशः उधाण आलं होतं. सोशल मीडियावर याबाबत तूफान चर्चा चालू होती. एवढंच नाही तर तिच्या चाहत्यांनी तिला इंस्टाग्रम अकाउंटवरुन तिला शुभेच्छा देखील दिल्या. दरम्यान, घडत असलेल्या प्रकारवर अखेर एश्वर्याने मौन सोडलं आहे.

ऐश्वर्याने शेअर केली पोस्ट-

गेले अनेक दिवस ऐश्वर्या (Aishwarya Sharma) गूड न्यूज देणार असल्याच्या बातम्या येत होत्या. शिवाय एका कार्यक्रमात ऐश्वर्या चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर ऐश्वर्या (Aishwarya Pregnant) प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. मात्र, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ऐश्वर्याने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत ती म्हणाली की, मी प्रेग्नंट नाहीये. एवढंच नाही तर तिने प्रेग्नंसीच्या अफवा पसरवणाऱ्या नेटकऱ्यांची तिने शाळा घेतली. तिसऱ्यांदा ओरडून सांगतेय मी प्रेग्नंट नाही, असं म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

aishwarya sharma

अफवा पसरवणं बंद करा –

पुढे ती म्हणाली (Aishwarya Sharma) की, मी ही गोष्टी दोन वेळा सांगितली मात्र, आता मी ही” तिसऱ्यांदा ओरडून सांगत आहे की मी प्रेग्नंट नाही. सतत येणाऱ्या मेसेजचा आता मला त्रास होत आहे. अफवा पसरवणं बंद करा. मी एक व्यक्ती आहे. बऱ्याचदा माझं बीपी कमी होतं. मी चक्कर येऊन बेशुद्ध झाले तेव्हा माझं ब्लड प्रेशर 60-80 होतं. त्यामुळे मी सेटवरच चक्कर येऊन पडली होती. पुन्हा सांगते मी प्रेग्नंट नाही”.

News Title : Aishwarya sharma revealed about her pregnancy

महत्त्वाच्या बातम्या –

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

“काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हा….”; पंकजा मुंडेंची पोलिसांकडे मोठी मागणी