“आम्ही फक्त लढाई हरलोय पण…”, गब्बर धवनने रणशिंग फुंकले!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shikhar Dhawan | आपल्या सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला नमवून विजयी सलामी देणाऱ्या पंजाब किंग्जच्या संघाला आपल्या दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सोमवारी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) यांच्यात सामना झाला. पाहुणा पंजाबचा संघ दुसऱ्या तर यजमान आरसीबीचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात होता. अखेरच्या षटकापर्यंत सामन्याचा थरार रंगला अन् अखेर यजमानांनी बाजी मारली. (IPL 2024)

RCB कडून दिनेश कार्तिकने फिनिशिंग टच दिला. पंजाब किंग्जकडून कर्णधार शिखर धवनने किल्ला लढवला पण त्याला देखील फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या. आरसीबीसमोर सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात पाहुण्यांना यश आले.

आरसीबीचा विजय

पण, विराट कोहलीच्या अप्रतिम खेळीने सामना एका बाजूला झुकला. मात्र पंजाबने पुनरागमन करत रंगत आणली. पण, अखेर विजय यजमानांचाच झाला. किंग कोहलीने 2 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 49 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी केली. सामना गमावला असला तरी पंजाबचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan Latest Post) सोशल मीडियावर एक पोस्ट करत रणशिंग फुंकले आहे.

गब्बर धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक बोलकी स्टोरी ठेवली आहे. ज्यामध्ये तो म्हणतो की, आम्ही एक लढाई हरलो आहोत पण युद्ध नाही… आम्ही चांगले पुनरागमन करू. खरं तर दिनेश कार्तिकने अप्रतिम खेळी करताना 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा कुटल्या अन् पंजाबला पराभवाची धूळ चारली.

Shikhar Dhawan ची इंस्टा स्टोरी

दरम्यान, पंजाबने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक खेळी केली. त्याची ही खेळी ऐतिहासिक ठरली असून किंग कोहली ट्वेंटी-20 मध्ये 100 हून अधिकवेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावावर नाना विक्रमांची नोंद असून आता त्यात आणखी भर पडली.

१७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने १९.२ षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या. विराट कोहलीने सर्वाधिक (७७) धावा केल्या, तर रजत पाटीदार (१८) आणि दिनेश कार्तिकने नाबाद (१८) धावा केल्या.

News Title- Captain Shikhar Dhawan has made a big statement after pbks vs rcb defeat
महत्त्वाच्या बातम्या –

कोहलीसाठी काहीपण! चाहत्याने भर मैदानात केलं असं काही की प्रेक्षक पाहतच राहिले

विराट ‘नंबर वन’! किंग कोहलीची ऐतिहासिक खेळी, ठरला पहिला भारतीय

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल