तुमच्या वाहनाचा क्रमांक म्हणजे तुमची ओळख! अशाप्रकारे मिळवा VIP वाहन क्रमांक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Fancy Registration Number for Vehicles l कारप्रेमींच्या फायद्याची बातमी आहे. आजकाल तरुणांना कार, बाईकची क्रेझ जास्त आहे. कारण बाजारात नवनवीन कार लाँच झाल्या की तरुणवर्ग वाहन खरेदी करण्याला जास्त भर देतात. तसेच ग्राहक वाहन खरेदी करताना आपल्या वाहनाच्या रंगापासून ते नंबरपर्यंत सर्वच गोष्टी आवडत्या घेत असतात. त्यामुळे कार आणि बाईकसाठी फॅन्सी नोंदणी क्रमांक हा तुमचे वाहन आकर्षक करते.

Fancy Registration Number for Vehicles l वाहनासाठी फॅन्सी नंबर कसा मिळवायचा? :

कार आणि बाईकसाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नोंदणी क्रमांकासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागते. तुम्हाला फॅन्सी कार नंबर किंवा बाईक नंबर मिळवणे कठीण होऊ शकते. कारण तुम्हाला फॅन्सी नंबर हा ई-लिलावाद्वारे मिळवावा लागतो. आज आम्ही तुम्हाला कार आणि बाईकसाठी फॅन्सी नोंदणी क्रमांक कसा मिळवायचा याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल तर आवश्यक शुल्क भरून तुम्ही फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर निवडू शकता. मात्र कार खरेदी करताना ही प्रक्रिया होत नाही तर तुम्हाला ई-ऑक्शनद्वारे फॅन्सी नंबरसाठी बोली लावावी लागेल. ही एक ई-लिलाव प्रक्रिया असल्याने फॅन्सी नोंदणी क्रमांक वाहन डीलरशिपवर ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्ही RTO मध्ये न जाता लिस्टमधून तुमचा आवडता नंबर निवडू शकता. प्रत्येक राज्यात प्रत्येक व्हीआयपी कार क्रमांकासाठी आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली असून या मूळ किमतीपासून बोली सुरू होते. तर फॅन्सी कार क्रमांकांसाठी बोली प्रक्रिया कशी आहे हे काही स्टेप्सद्वारे समजून घेऊयात…

फॅन्सी वाहन क्रमांक मिळवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा! :

स्टेप 1: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक वापरकर्ता म्हणून ऑनलाइन नोंदणी करा.

स्टेप 2: साइन अप केल्यानंतर आणि तुमच्या खात्यात लॉग इन केल्यानंतर फॅन्सी नंबर निवडा.

स्टेप 3: नोंदणीसाठी आवश्यक शुल्क भरा आणि क्रमांक आरक्षित करा.

स्टेप 4: तुमच्या पसंतीच्या VIP कार नंबरसाठी बोली लावा.

स्टेप 5: लिलाव संपल्यानंतर निकाल घोषित केला जाईल, ज्यामध्ये तुम्ही उर्वरित रक्कम अदा करू शकता किंवा वाटप न झाल्यास परतावा मिळवू शकता.

News Title : Fancy Registration Number for Vehicles

महत्त्वाच्या बातम्या- 

2 मुलींनी हद्दच केली! होळीचा सण पडला लय ‘भारी’, पोलिसांची मोठी कारवाई, Video

अजित पवार यांच्या डोकेदुखीत वाढ; पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य विरोधात

सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

वाचनीय: CSK त ऋतु’राज’! मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत; पण पांड्या ‘लक्ष्य’ का?

‘या’ राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार!