अजित पवार यांच्या डोकेदुखीत वाढ; पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य विरोधात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाकडे देशातील सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अजित पवार यांच्याविरोधामध्ये पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याने प्रचार करायला सुरूवात केली आहे. काही दिवसांआधी अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक सभा घेतली होती. त्यासभेमध्ये मला कुटुंबातून एकटं पाडलं जात असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. तिच परिस्थिती अजित पवार यांच्यासोबत दिसून येत आहे. (Baramati Lok Sabha)

अजित पवार यांच्या डोकेदुखीत वाढ

बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे लढणार आहेत. अशातच आता शिवसेना माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघावर दावा केला आहे. यामुळे आता अजित पवार यांच्या डोकेदुखीत वाढ होऊ लागली आहे.

अजित पवार यांच्याविरोधात प्रचार

एकाबाजूने महायुतीतून आव्हान मिळतंय तर दुसरीकडे अख्ख पवार कुटुंब अजित पवार यांच्याविरोधात आहे. अशातच आणखी एका पवार कुटुंबातील सदस्याने सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं आणि अजित पवार यांच्याविरोधामध्ये प्रचारास सुरूवात केली आहे.

अनेक दिवसांपासून पवार कुटुंबातील अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मागे खंबीर उभे आहेत. अशातच आता श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार या अजित पवार यांच्याविरोधात प्रचार करत आहेत.

काही दिवसांआधी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि बहिण सई पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात प्रचार केला. आता श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आणि शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी इंदापूरमध्ये जात अजित पवार याच्याविऱोधात प्रचार केला आहे. त्यावेळी आमच्या रॅलीला, आमच्या सभांना आणि कार्यक्रमांना युवकांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“विरोधकांना दुसरा कामधंदा नाही”

“विरोधकांना काही काम नाही. आम्ही जी उडी घेतली स्पष्ट आहे. बारामती आणि इंदापूरच्या लोकांना सांगण्याची गरज नाही. आता विरोधकांना मुद्दे नाहीत. त्यामुळे आता ते काहीही प्रचार करत आहेत. विरोधकांना दुसरा कामधंदा राहिला नाही”, असं शर्मिला पवार म्हणाल्या आहेत.

News Title – Baramati Lok Sabha Election in Ajit Pawar Against Pawar Family

महत्त्वाच्या बातम्या

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

“काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हा….”; पंकजा मुंडेंची पोलिसांकडे मोठी मागणी

‘बीडचं पार्सल परत पाठवू’; प्रणिती शिंदेंचा पहिला हल्ला

‘ही तर राहाची जुळी बहीणच दिसतेय’, ‘तो’ फोटो पाहून चाहतेही चकित