Mira Road | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. रमजानचा महिना सुरू आहे. अशातच लक्षवेधी असणाऱ्या मीरा रोडवर (Mira Road) झालेल्या प्रकरणाला काही महिने उलटून गेले तोवर आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलाने जयश्रीरामचा नारा लगावल्याने त्याला मारहाण करण्यात आली आहे.
मीरा रोड (Mira Road) येथे 21 जानेवारीला दोन गटांमध्ये राडा झाला होता. राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी एक गट रॅली काढत होता. त्यावेळी दुसऱ्या गटाने त्यांच्यावर दगडफेक केली. त्यावेळी भाजप नेते नितेश राणे यांनी घडलेल्या घटनेस्थळी दुसऱ्या दिवशी जात प्रकरणाचा आढावा घेतला. आता पुन्हा एकदा मीरा रोड (Mira Road) येथे 25 मार्च रात्री 9 वाजता धक्कादायक घटना घडली आहे.
मीरा रोड (Mira Road) येथे अल्पवयीन मुलाला जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने काही युवकांनी मारहाण केली आहे. यामुळे पुन्हा एकदा धार्मिक वाद विकोपाला पेटलेला पाहायला मिळाला आहे. अल्पवयीन मुलगा रात्री दुध आणण्यासाठी बाहेर आला. त्यावेळी त्याने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्यावरून त्याला मारहाण करण्यात आली असून त्याला अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यास भाग पाडलं.
काय घडलं नेमकं?
सोमवारी अल्पवयीन मुलगा दुध घेऊन सोसायटीच्या गेटवर येत होता. सोसायटीच्या जवळ असलेल्या एका व्यक्तीला तो जय श्रीराम बोलला. त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असलेल्या चार ते पाच जणांनी त्याला थांबायला सांगितलं आहे. पीडित मुलगा त्यांना पाहून घाबरला. तो सोसायटीच्या आत पळाला. आरोपीसुद्धा त्याच्या मागे पळाले. आरोपींनी पीडित मुलाला लिफ्ट जवळ पकडलं. त्याला मारहाण केली.
जय श्रीराम म्हणणारा व्यक्ती वॉचमन नव्हताच
दुधाची पिशवी घेत पीडित मुलगा गेटजवळ आला. गेटजवळ उभा असलेला व्यक्ती वॉचमन असल्याचं त्याला वाटलं. त्यामुळे त्यानं त्याला जय श्रीराम म्हणत घोषणा दिली. मात्र तो व्यक्ती वॉचमन नव्हता.
‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास पाडलं भाग
पीडित मुलाला त्यातील काहींनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडलं आहे. हा घडलेला प्रकार तेथे एका उपस्थित व्यक्तीने पीडित मुलाच्या वडिलांना सांगितला. त्याचे वडील तेथे पोहचेपर्यंत ते युवक तेथून पसार झाले.
News Title – Mira Road In A boy say Jay shree Ram Other Adult People Attack Him
महत्त्वाच्या बातम्या
उन्हाळ्यात काकडी खाण्याचे आहेत इतके फायदे; ऐकून चकित व्हाल!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर; 32 वर्षांनंतर प्रथमच होणार असं
उन्हाचा पारा वाढणार, राज्यात ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता
कंगनावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट, काँग्रेस नेत्या अडचणीत; नेमकं प्रकरण काय?
यंदाच्या वर्षी ‘या’ तारखेपासून सुरु होणार चैत्र नवरात्री; जाणून घ्या शुभ मुहूर्त