‘त्या रात्री मनोज जरांगेंनी…’; वाशीतील सभेबाबत बारस्करांचा मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. जरांगेंच्या सभेला लाखो मराठा बांधव पाठिंबा देत आहेत. एवढंच नाही तर जरांगे रोज महत्त्वाची बैठक घेत याबाबत निर्णय आणि सरकारला इशारा देत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी जरांगे यांचे खास आणि जवळचे मित्र मानले जाणारे अजय महाराज बारस्कर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी जरांगेंनी बारस्कर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले. दरम्यान अजय बारस्कर यांनी पुन्हा एकदा जरांगेंवर आरोप करत नवा खुलासा केला आहे.

काय म्हणाले बारस्कर?

अजय बारस्कर यांनी आज (26 मार्च) पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) टीका केली. यावेळी बोलत असताना त्यांनी वाशीतील सभेआधी जरांगेंनी मटण खाल्याचं देखील सांगितलं. बारस्कर म्हणाले की, ज्यावेळेस जरांगेंनी उपोषण केलं होतं त्याजदिवशी आदल्या रात्री त्यांनी मटण खाल्लं आणि दुसऱ्यादिवशी वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.

कुठून आला पैसा?

एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलं. ज्यांच्या हाताने तुम्ही उपोषण सोडलं त्या महिलेने तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली. कुठून आले पैसे?, असा सवालही बारसकर यांनी विचारलं. तुम्ही आता फडणवीस साहेब फडणवीस साहेब म्हणायला लागले. एसआयटी चौकशीला घाबरलात, असा आरोप बारसकर यांनी जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर केला.

पुढे ते म्हणाले की, जरांगे हा लोकांना भ्रमित करत आहे. तिकडे अरविंद केजरीवाल जर चौकशीला घाबरले नाहीत तर मग तुम्ही का घाबरत आहेत?, असा सवाल बारस्करांनी जरांगे केला.

लोकसभेचा काही फायदा नाही का?

जरांगे हा दहावी बारावी छाप, पास झाला की नापास ते माहित नाही. मात्र, या माणसाला कसलंही ज्ञान नसताना याने सगळ्यांना भरकटवलं. लोकसभेत आपलं काही गुंतलं नाही. आरक्षण जे मिळणार आहे ते राज्यात मिळणार आहे असं ते म्हणाले. खरंच असं आहे का? लोकसभेचा काहीच फायदा नाही का? किती मराठ्यांना फायदा झाला हे जरांगेने सांगावं, असंही ते म्हणालेत. 

News Title : manoj jarange accused by ajay baraskar

महत्त्वाच्या बातम्या-

जय श्रीराम घोषणा देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण, अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यास पाडलं भाग

“अमोल कोल्हेंची बेडूक उडी…”, आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे आहेत इतके फायदे; ऐकून चकित व्हाल!

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर; 32 वर्षांनंतर प्रथमच होणार असं

उन्हाचा पारा वाढणार, राज्यात ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता