POCO C61 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

POCO C61 Smartphone Launched l Poco कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, या फोनचे नाव Poco C61 आहे. Poco ने हा फोन कमी बजेट रेंजमध्ये लाँच केला आहे. जर तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर त्यांच्यासाठी Poco C61 हा स्मार्टफोनचा सर्वात्तम पर्याय असेल.

पोकोच्या या नवीन स्मार्टफोनला मिळणार जबरदस्त कॅमेरा :

पोकोच्या सी-सिरीजचा हा नवीन स्मार्टफोन आहे. कंपनीने या फोनच्या मागील बाजूस एक गोल आकारात कॅमेरा दिला आहे व त्यासोबतच एक रिंग डिझाइन दिली आहे. या डिझाइनमुळे हा फोन इतर बजेट रेंज फोन्सपेक्षा थोडा वेगळा आहे.

डिस्प्ले : या फोनमध्ये 6.7-इंचाची एलसीडी स्क्रीन, एचडी प्लस रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट, 500 निट्सची पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिले आहे.

कॅमेरा : या फोनच्या मागील भागात AI लेन्स आणि LED फ्लॅशसह 8MP कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे.

प्रोसेसर : या फोनमध्ये प्रोसेसरसाठी MediaTek Helio G36 SoC चिपसेट देण्यात आला आहे, जो GPU सोबत IMG PowerVR GE8320 GPU सह येत आहे.

OS : हा फोन Android 14 आधारित OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

बॅटरी : या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंग आणि USB Type-C चार्जिंग पोर्टसह येते.

कनेक्टिव्हिटी : या फोनमध्ये ड्युअल सिम 4G, Wi-Fi 5 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.4, GPS, GLONASS, Galileo आणि BeiDou सारखी अनेक विशेष वैशिष्ट्ये आहेत.

POCO C61 Smartphone Launched l किंमत किती असणार? :

या फोनचा पहिला प्रकार 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 7,499 रुपये आहे.
या फोनचा दुसरा प्रकार 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 8,499 रुपये आहे.

News Title – POCO C61 Smartphone Launched

महत्त्वाच्या बातम्या

आज ऋतुराज अन् शुभमन आमने सामने! कोण वरचढ ठरणार

‘त्या रात्री मनोज जरांगेंनी…’; वाशीतील सभेबाबत बारस्करांचा मोठा खुलासा!

जय श्रीराम घोषणा देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण, अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यास पाडलं भाग

“अमोल कोल्हेंची बेडूक उडी…”, आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे आहेत इतके फायदे; ऐकून चकित व्हाल!