मोठी बातमी! शिवाजी आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.

शिवाजी आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे.

शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाची चर्चा झाली त्यावेळी अजित पवार यांनी या जागेवर दावा सांगितला. दुसरीकडे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे या जागेसाठी आग्रही होते. ते या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. त्यांची या मतदारसंघात ताकदही आहे. त्यामुळे शिवसेनेला ही जागा मिळावी, अशी त्यांची मागणी होती.

कोल्हेंना पराभूत करण्याचा अजित पवारांचा निर्धार

दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या काळात शिरूर मतदारसंघ शिवसेनेकडं होता. शिवाजीराव आढळराव पाटील हे तीन वेळा इथून निवडून आले होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळरावांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतरही ते मतदारसंघात सक्रिय राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे हे आपल्याकडं येतील असा अजित पवारांचा विचार होता. मात्र कोल्हे हे शरद पवारांशी निष्ठावंत राहिले. त्यामुळे अजित पवारांनी त्यांना पराभूत करण्याचा निर्धारच केला आहे. त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा!

आज CSK विरुद्ध GT सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

ठाकरे गटाच्या नेत्यांचा श्रीकांत शिंदेंविरोधात लढण्यास नकार?; आता ‘ही’ नावं चर्चेत

POCO C61 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

आज ऋतुराज अन् शुभमन आमने सामने! कोण वरचढ ठरणार