अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NCP Candidate | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवाराचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 मार्च आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार आणि खासदार यांच्यासोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. (NCP Candidate)

अजित पवार यांनी पहिल्या उमेदवाराची घोषणा (NCP Candidate) केली आहे. रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नेते सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी सांगितली. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आल्यानं आढळराव पाटील यांचा सायंकाळी पक्षामध्ये प्रवेश करून त्यांच्या उमेदवारीची (NCP Candidate) घोषणा करायची, असं ते म्हणाले.

आम्ही एकत्रित चर्चा करून जवळपास महायुतीच्या 48 जागांबद्दल कोणी कोणत्या जागा लढवायच्या हे ठरवलं आहे. जवळपास 99 टक्के काम पूर्ण केलं आहे. फक्त आमचं ठरलं आहे की 28 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रित बसून मुंबईला पत्रकार परिषद घेऊ. आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं. वेगवेगळ्या पक्षांनी राजकीय उमेदवार प्राप्त केले आहेत, असं अजित पवार म्हणालेत.

पहिल्या उमेदवारीची घोषणा

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पहिल्या उमेदवारीची घोषणा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहे. रायगडची जागा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना असेल. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रामदास आठवले, कवाडे, सदाशिव खोत, रासपचे महादेव जानकर, विनायक गोरे असे सर्व सहकारी मिळून महाराष्ट्रातील जागा लढवत आहोत. विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान आहे. इतर जागांबाबत 28 तारखेला माहिती देईन,” असं अजित पवार म्हणाले.

आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश होणार

आम्ही थोड्यावेळानं आंबेगाव येथे जाणार आहे. आंबेगावात शिवाजी आढळराव पाटील जे 20 वर्षांपूर्वी आपल्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश देत आहोत. तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं पक्षप्रवेश केल्यानंतर जाहीर करेल. त्यानंतर महायुतीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली जाईल, असं अजित पवार म्हणाले.

पाच वर्षांआधी आम्ही आघाडीच्या बाजूनं लढलो. भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 4, काँग्रेस, नवनीत राणा 1 जागा आम्ही पुरस्कृत केलं होतं. त्या निवडून आल्या होत्या. एमआयएमची एक जागा छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आल्या होत्या, असं अजित पवार म्हणाले. (NCP Candidate)

News Title – NCP Candidate Announcement Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

POCO C61 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

आज ऋतुराज अन् शुभमन आमने सामने! कोण वरचढ ठरणार

‘त्या रात्री मनोज जरांगेंनी…’; वाशीतील सभेबाबत बारस्करांचा मोठा खुलासा!

जय श्रीराम घोषणा देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण, अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यास पाडलं भाग

“अमोल कोल्हेंची बेडूक उडी…”, आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला