आज CSK विरुद्ध GT सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

CSK vs GT | आयपीएल 2024 चा पहिला सामना काल 22 मार्चरोजी चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात झाला. पहिल्याच सामन्यात चेन्नईने बंगळुरूला धूळ चारली. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात 6 विकेट्सने मोठा विजय नोंदवला. त्यामुळे स्पर्धेची सुरुवात चेन्नईने जोरदार विजयासह केली.

आज (26 मार्च)चेन्नईचा सामना गुजरातशी होणार आहे. आजची मॅच चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉकवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले सामने जिंकले आहेत. आता आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

आज CSK विरुद्ध GT सामना रंगणार

चेन्नईचा नवोदित कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यांचा संघ एकमेकांशी आज भिडणार. दोन्ही कर्णधार आपली विजयी लय (CSK vs GT ) कायम राखण्यावर भर देतील. गुजरातने मुंबईचा पराभव करत पहिलाच विजय प्राप्त केला. आजच्या सामन्यात शुभमनच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल. त्याला मुंबई विरुद्धच्या सामन्यात फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे आज तो आक्रमक खेळू शकतो.

गुजरातला आजच्या सामन्यात 2023 चा वचपा काढण्याची संधी देखील असेल. 2023 च्या आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईनं गुजरातला पराभूत करत आयपीएलमधील पाचवं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये गुजरात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करुन गेल्या वर्षीच्या फायनलचा वचपा काढण्यात यशस्वी होईल का हे पाहावं लागेल.

अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग 11 : ऋतुराज गायकवाड (कर्णधार),एम.एस.धोनी, रचिन रवींद्र,अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, दीपक चहर, महेश थीक्षाना, मुस्तफिजूर रहमान आणि तुषार देशपांडे.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11 : शुभमन गिल (कर्णधार),रिद्धिमान साहा, डेविड मिलर, अजमतुल्लाह उमरजई, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, मोहित शर्मा, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेन्सर जॉनसन

सामन्यांचे थेट प्रक्षेपण कोठे पाहावे?

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील थेट सामना (CSK vs GT ) आज 7:30 वाजता सुरू होईल. तुम्ही हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहू शकता. तर, मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर सामना पाहू शकता.

News Title : CSK vs GT Match Probable Playing 11

महत्त्वाच्या बातम्या- 

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

“काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हा….”; पंकजा मुंडेंची पोलिसांकडे मोठी मागणी