“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाकडे केवळ राज्याच्या नाहीतर देशाच्या नजरा खिळल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांसमोर लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार एकमेकांविरोधात लढणार आहे. पवार कुटुंब हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाजूनं प्रचार करत आहे. तर अजित पवार हे आपल्या पत्नीच्या बाजूनं प्रचार करत आहेत.

बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघामध्ये काही दिवसांआधी अजित पवार यांनी सभेला संबोधित करत असताना मला कुटुंबानं एकटं टाकलं असल्याचा दावा केला होता. सध्या अजित पवार यांच्यासोबत तिच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पाटील अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी शर्मिला पवार या सुनेत्रा पवार यांच्याविरोधात प्रचार करत आहेत. यापार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघामध्ये (Baramati Loksabha) जात गावभेटी देत आहेत. मतदारांना विश्वासात घेत आहेत. त्या आज भोर, वेल्हा, मुळशीसारख्या तालुक्यांमध्ये प्रचार करत होत्या. यावेळी त्यांनी सारोळा येथील ग्रामीण भागात जात मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून एक पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे पोस्ट?

“सारोळ्यात सगळेच एकवटले..! अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदार संघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले. सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला 24 तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला.”

“आजोळातून मिळणारे प्रेम मला सारोळा येथे मिळणार”

यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची दखल मी घेतली असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही. ज्या ठिकाणी ही सदिच्छा भेट झाली ते ठिकाण पाहून मला माझ्या आजोळची आठवण झाली. त्या अर्थाने आजोळातून मिळणारे प्रेम मला सारोळा येथे मिळणार याची खात्री येथील एकजुटीने मिळाली, असं सुनेत्रा पवार म्हणाल्यात.
“यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना तालकाप्रमुख अमोल पांगारे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, बाळासाहेब गरुड, विद्याताई पांगारे, नीलम झांजले, अर्जुनराव अहिरे, गणेश निगडे, महेंद्र भोरडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे मनापासून आभार,” अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली आहे.
सुनेत्रा पवार यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून सध्या याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या पोस्टवर कार्यकर्त्यांनी विजय फिक्स, विजयी भव ताईसाहेब इतर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Baramati Loksabha)

News Title –  Baramati Loksabha Sunetra pawar Facebook Post Aganist Pawar Family

महत्त्वाच्या बातम्या

“सच्च्या मराठ्यांनी जरांगेंना शिव्या…”; बारस्करांच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

अजित पवारांनी धनंजय मुंडेंना दिली सर्वांत मोठी जबाबदारी!

मोठी बातमी! शिवाजी आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश

अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा!

आज CSK विरुद्ध GT सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11