Taapsee Pannu | बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार अशा चर्चा होत्या. तापसीच्या लग्नाशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. काही मिडिया रिपोर्टनुसार, तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्यासोबत लग्न केलं असल्याची माहिती मिळत आहे. सध्या तापसीच्या लग्नाचीच जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
अशातच तापसीचा अजून एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तापसी आपल्या परिवारासोबत होळी साजरी करताना दिसून येत आहे. हे फोटो बघून चाहतेही संभ्रमात आहेत. तिचे फोटो बघून नेटकरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
तापसीचे फोटो व्हायरल
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तापसी (Taapsee Pannu) बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत होळीचा आनंद लुटताना दिसून येत आहे. मात्र. यात एक आकर्षक गोष्ट म्हणजे एका फोटोत तापसीच्या भांगेत सिंदूर दिसून येत आहे. लाल रंगाचे सिंदूर पाहून नेटकरीही सवाल करत आहेत.
तापसीने अखेर लग्न केलंच, असं चाहते म्हणत आहेत. हा फोटो पाहून युजर्सकडून अनेक कमेंट्स केल्या जात आहेत. कालपासून सोशल मिडियावर तापसीच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. त्यातच आता हा फोटो देखील चर्चेत आला आहे.
तापसीने बॉयफ्रेंडसोबत साजरी केली होळी
तापसी (Taapsee Pannu ) आणि बॉयफ्रेंड मॅथियास बो यांनी 23 मार्च रोजी लग्न केलं असल्याची माहिती आहे. त्यांनी उदयपूर येथे लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तापसी पन्नू आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांनी फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं अशी चर्चा आहे.
View this post on Instagram
तापसीच्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांचा समावेश होता. तापसीने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘मनमर्जियां’ आणि ‘दोबारा’ या सिनेमांत काम केलं आहे. त्यामुळे तापसीसोबत त्यांच्या उपस्थितीने अनेक सवाल निर्माण केले आहेत. अद्याप तापसी आणि मॅथियास यांच्या लग्नाबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आली नाही. त्या दोघांनीही याबाबत अद्याप कोणतंच भाष्य केलं नाहीये. मात्र, काही रिपोर्टनुसार त्यांनी लग्न केलं असल्याची माहिती आहे.
News Title : Taapsee Pannu first picture surfaced during the marriage talks
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही फक्त लढाई हरलोय पण…”, गब्बर धवनने रणशिंग फुंकले!
कोहलीसाठी काहीपण! चाहत्याने भर मैदानात केलं असं काही की प्रेक्षक पाहतच राहिले
विराट ‘नंबर वन’! किंग कोहलीची ऐतिहासिक खेळी, ठरला पहिला भारतीय
लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?
लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…