…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shubman Gill | आयपीएलच्या सतराव्या (IPL 2024) हंगामातील सातव्या सामन्यात मागील हंगामातील चॅम्पियन आणि उपविजेता संघ भिडला. (CSK vs GT) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत रंगली. दोन्हीही संघ युवा कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघांनी आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवला. दरम्यान, ऋतुराज आणि शुभमन नाणेफेकीसाठी आले तेव्हा एक हास्यास्पद घटना घडली. (IPL 2024 News)

खरं तर झाले असे की, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने येताच गिल गडबडला. मग त्याने अचानक फलंदाजी करायची आहे, असे बोलून टाकले. पण नंतर त्याची चूक त्याच्या लक्षात आली. चूक समजताच त्याने सॉरी म्हणत प्रथम गोलंदाजी करायची असल्याचे सांगितले.

GT vs CSK थरार

शुभमन गिल पहिल्यांदाच गुजरातच्या संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वात गुजरातने आपल्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला. पण, तेव्हा मागील हंगामातील उपविजेता गुजरातचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने विजय मिळवून मुंबईच्या तोंडचा घास पळवला.

Shubman Gill कडे गुजरातची धुरा

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून ही जबाबदारी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडवर सोपवली आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यामुळे तो यंदा आयपीएलमधून निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल 2024 चा अंतिम सामना देखील धोनीच्या घरच्या मैदानावर अर्थात चेपॉक स्टेडियमवर 26 मे रोजी होणार आहे.

 

चेन्नईचा संघ –

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी, दीपक चाहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे,

गुजरातचा संघ –

शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्लाह ओमरजई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर, मोहित शर्मा, स्पेंसर जॉन्सन.

News Title- IPL 2024 GT vs CSK A funny incident happened with Shubman Gill
महत्त्वाच्या बातम्या –

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत

बारामतीत उमेदवार बदलणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

बच्चन कुटुंबाच्या फॅमिलीफोटोत ऐश्वर्या राय गायब; अखेर सत्य आलं समोर

‘या’ 5 गोष्टींचं पालन केलं तर घरात नेहमी लक्ष्मीची कृपा राहील!