“जनतेच्या मनातील मोदी कसे पुसणार?”, रक्षा खडसेंचा नणंद रोहिणी खडसेंना टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raksha Khadase | जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadase) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद विरूद्ध भाऊजय अशी टक्कर आहे. त्याचप्रमाणे रावेर मतदारसंघामध्ये नणंद रोहिणी खडसे विरूद्ध भाउजय रक्षा खडसे (Raksha Khadase) आमने सामने लढणार आहेत.

माध्यमांशी बोलत असताना रक्षा खडसे (Raksha Khadase) यांनी कुटुंब आपल्यासोबत नसल्याचं सांगितलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्येही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया सुळेंविरोधात लढणार आहेत. त्यांच्यासोबतही पवार कुटुंब नसल्याचं अजित पवार म्हणाले होते. सुप्रिया सुळेंच्या बाजूनं पवार कुटुंब प्रचार करत आहेत. ही परिस्थिती राज्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. यावर आता रक्षा खडसे (Raksha Khadase) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“कुटुंबाची कमतरता जाणवत नाही”

रावेर लोकसभा मतदारसंघात माध्यमांशी बोलत असताना रक्षा खडसे म्हणाल्या, “आपलं कुटुंब आपल्यासोबत नाही. भारतीय जनता पार्टीचे संघटन माझ्याबाजूने आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे सर्व पाठिशी उभे आहेत. सर्वांनी माझ्या विजयाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कुटुंबियांची कमतरता मला जाणवत नाही”, असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.

“खतांच्या पिशव्यांवर पंतप्रधानांचे फोटो”

भाजपच्या नेत्या रक्षा खडसेंबाबत त्यांच्या नणंद राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. “जो उमेदवार शेतकऱ्यांसाठी लढेल. तो उमेदवार विजयी होईल. आचारसंहितेत खतांच्या पिशव्यांवर पंतप्रधानांचे फोटो पाहायला मिळतायेत,” असं म्हणत रोहिणी खडसेंनी प्रश्न केला. यावर रक्षा खडसेंनी उत्तर दिलं आहे.

रक्षा खडसेंचं प्रत्युत्तर

“मी शेतकऱ्यांसाठीच लडतेय, त्यांनी जो विषय मांडलाय. तो बरोबर आहे. त्यातच खताच्या पिशवीवरून मोदींचा फोटो तुम्ही पुसणार. मात्र जनतेच्या मनातील मोदीचे चित्र कसं पुसणार?”, असं म्हणत रोहिणी खडसेंच्या प्रश्नाला रक्षा खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“आशीर्वाद आपण प्रत्येकाचे घेत असतो. तो विरोधी नेता असो वा कोणीही असो. ही आपली संस्कृती आहे. चांगलं काम करण्यासाठी आशीर्वाद घ्यावेच लागतात. त्यांना मतदान करायचं किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

News Title – Raksha Khadase Against Rohini Khadase

महत्त्वाच्या बातम्या

यंदाच्या वर्षी ‘या’ तारखेपासून सुरु होणार चैत्र नवरात्री; जाणून घ्या शुभ मुहूर्त

तुमच्या वाहनाचा क्रमांक म्हणजे तुमची ओळख! अशाप्रकारे मिळवा VIP वाहन क्रमांक

2 मुलींनी हद्दच केली! होळीचा सण पडला लय ‘भारी’, पोलिसांची मोठी कारवाई, Video

अजित पवार यांच्या डोकेदुखीत वाढ; पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य विरोधात

सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल