महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘हे’ बडे नेते करणार प्रचार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रासाठी आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. तर, अजित पवार गटाने कालच आपला एक उमेदवार जाहीर केलाय. बाकी यादी 28 तारखेला पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

अशातच भाजपने आपल्या स्टार प्रचारकांचीही यादी आज (27 मार्च) जाहीर केली आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार असल्याने या यादीत शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याही नेत्यांची नावं आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस प्रचार करणार आहेत.

महायुतीने महाराष्ट्रातील 40 स्टार प्रचारकांची यादी (BJP Star Campaigners) जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फडणवीस, पवार आणि शिंदे प्रचार करणार आहेत. आजच ठाकरे गटानेही आपल्या उमेदवार जाहीर केले आहेत. तर महायुतीकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे.

महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले काग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , विनोद तावडे , पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार (Lok Sabha Elections 2024) प्रचार करणार आहेत.

भाजपची 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी

नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, नारायण राणे, अनुराग ठाकूर , राजनाथ सिंह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल, विष्णु देव साई , डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती ईराणी, रावसाहेब दानवे, शिवराज सिंह चौहान, सम्राट चौधरी, अशोक चव्हाण.

विनोद तावडे, चंद्रशेकर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे , चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, पियुष गोयल, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, के. अन्नामलाई, मनोज तिवारी, रवी किसन, अमर साबळे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि धनंजय महाडिक या 40 प्रचारकांची (Lok Sabha Elections 2024) नावे या यादीत आहेत.

News Title : Lok Sabha Elections 2024 Mahayuti announced star campaigners list

महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चाललंय तरी काय? बाबर आझमबद्दल मोठी घोषणा!

भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता; विद्यमान खासदार ठाकरेंच्या वाटेवर?

महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट; छगन भुजबळ लोकसभेची निवडणूक लढवणार?

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी

SIP मध्ये जास्त फायदा हवा असेल तर या 4 गोष्टी लक्षात घ्या; होईल फायदाच फायदा