पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चाललंय तरी काय? बाबर आझमबद्दल मोठी घोषणा!

Babar Azam | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) जून 2024 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या तयारीला लागले आहे. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात झालेल्या दारूण पराभवानंतर शेजारील देशात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. बाबर आझमला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर पीसीबीने ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर सोपवली. तर कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूदकडे देण्यात आले आहे.

आता पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही मोठे निर्णय घेतले आहेत. अलीकडेच मोहम्मद हफिजच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त करण्यात आली. त्याला हटवून सात सदस्यीय नवीन निवड समिती बनवण्यात आली आहे. या निवड समितीचा कोणीही अध्यक्ष नसेल आणि प्रत्येक सदस्याला समान अधिकार असतील असे बोर्डाने सांगितले.

PCB मध्ये नाट्यमय घडामोडी

सध्या शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार आहे. पण, त्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शाहीनला वगळून एखाद्या फलंदाजावर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. या यादीत माजी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचे नाव आघाडीवर आहे. लक्षणीय बाब म्हणजे ‘क्रिकेट पाकिस्तान’ने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा बाबर आझमवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

भारतात मागील वर्षी पार पडलेल्या विश्वचषकानंतर बाबर आझमने कर्णधारपद सोडले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नेहमी नाट्यमय घडामोडी घडत असतात. बाबरने कर्णधारपद सोडल्यानंतर पाकिस्तानी संघ शान मसूदच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे शेजाऱ्यांना कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला.

 

Babar Azam कडे कर्णधारपद

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पीसीबीचे माजी अध्यक्ष झका अश्रफ यांच्या धोरणांना विरोध करत त्यांनी निवडलेली समिती बरखास्त केली. लाहोरमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही हे सर्वकाही ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी करत आहोत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले इमाद वसिम आणि मोहम्मद आमिर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जर्सीत दिसणार आहेत. बोर्डाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा माघारी दिला आहे. त्यामुळे हे दोघेही ट्वेंटी-20 विश्वचषकात दिसतील यात शंका नाही.

News Title- Pakistan cricket board set to reappoint star player Babar Azam as captain

महत्त्वाच्या बातम्या –

महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट; छगन भुजबळ लोकसभेची निवडणूक लढवणार?

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी

SIP मध्ये जास्त फायदा हवा असेल तर या 4 गोष्टी लक्षात घ्या; होईल फायदाच फायदा

या विभागात सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार; या तारखेपर्यंत अर्ज करू शकता

पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट, वसंत मोरेंची मोठी खेळी