कंगना ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला म्हणाली ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

kangana ranaut | अभिनेत्री कंगना रनौत सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता तर तिला थेट लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओने खळबळ उडवली आहे.

कंगनाने प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं आहे. त्यामुळे कंगना चर्चेत आहे. तिच्या या वक्तव्यामुळे नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कंगनाच्या बाबतीत अनेक आता समोर येत आहेत.

“उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार”

झालं असं की, कंगनाला (kangana ranaut) उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या महिला नेत्याने तिच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून कंगनाचा एक अश्लील कॅप्शन आणि फोटो पोस्ट करण्यात आला होता. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला.

यानंतर भाजपाने कॉँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. कॉँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करणार असल्याचंही भाजपाच्या काही नेत्यांनी म्हटलं. वाद वाढताच सुप्रिया श्रीनेत यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी कंगनाबाबत पोस्ट कुणीतरी फेक अकाऊंट बनवून केली असल्याचं म्हटलं. मात्र, यानंतर सोशल मिडियावर कंगनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कंगना रनौतचा व्हिडीओ व्हायरल

कंगना रनौत (kangana ranaut) हिचा 2020 मधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ती म्हणाली होती की, “मी उर्मिला मातोंडकर हिची एक मुलाखत पाहिली होती. ज्याप्रकारे ती माझ्याबद्दल स्वतःचं मत मांडत होती, ज्याप्रकारे ती माझ्याबद्दल बोलत होती. वेग-वेगळे भाव तिच्या चेहऱ्यावर मला दिसत होते. माझ्या संघर्षावर खिल्ली उडवत होती. भाजपचं तिकिट मिळवण्यासाठी मी कशाप्रकारे प्रयत्न करतेय यावरुन माझ्यावर निशाणा साधत होती.”

“मला भाजपचं तिकिट मिळवणं खूप कठीण नाहीये. ती एक सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. सगळ्यांनया माहीत आहे की, उर्मिला कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे? सॉफ्ट पॉर्न करण्यासाठीच ना… तिला जर तिकिट मिळू शकतं, तर मला का नाही?”, असं म्हणत कंगनाने उर्मिलावर टीका केली होती. तिचा हाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. दरम्यान, 2019 मध्ये उर्मिला मातोंडकरने 2019 मध्ये मुंबई-उत्तर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र, नंतर तिने काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आता कंगनाच्या व्हायरल व्हिडीओमुळे उर्मिलाही चर्चेत आली आहे.

News Title : Kangana Ranaut called Urmila Matondkar a soft porn star

महत्वाच्या बातम्या-

हिंदू नववर्ष सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व!

मोठी गुड न्यूज! सोन्याचे भाव उतरले; जाणून घ्या आजचे दर

प्रतीक्षा संपली! भन्नाट फीचर्ससह Realme 12x 5G स्मार्टफोन ‘या’ दिवशी लाँच होणार

कंगनानंतर ‘ही’ अभिनेत्रीही करणार राजकारणात एंट्री?, चर्चांना उधाण

मोठी बातमी! ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कुणा-कुणाला मिळालं तिकीट?