प्रतीक्षा संपली! भन्नाट फीचर्ससह Realme 12x 5G स्मार्टफोन ‘या’ दिवशी लाँच होणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Realme 12X 5G India Launch Date l सध्या Realme ही एक आघाडीची कंपनी आहे. कारण Realme कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्ससह अनेक स्मार्टफोन लावून करत असते. अशातच आता कंपनीने ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी Realme 12x 5G हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन भारतात 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे.

Realme 12X 5G India Launch Date l स्मार्टफोन अवघ्या काही मिनिटांत होणार चार्ज :

कंपनीने यापूर्वी Realme 12 series आणि Realme Narzo 70 Pro 5G ची घोषणा केली होती आणि त्यानंतर अगदी काही दिवसांतच Realme 12x 5G ची घोषणा करण्यात आली आहे. Realme ने शेअर केलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 12x 5G 45W SUPER VOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल, जो की फोनमध्ये 0 ते 50% चार्जिंग अवघ्या 30 मिनिटांत होणार आहे. Realme 12x 5G स्मार्टफोनची बॅटरी क्षमता ही 5000mAh असणार आहे.

तसेच हा स्मार्टफोन 12x 5G 6nm चिपसेटद्वारे समर्थित असेल आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले असणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेट G57 MC2 GPU सह जोडलेला आहे. Realme 12x 5G 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येत आहे.

Realme 12X 5G India Launch Date l कॅमेरा फीचर्स काय आहेत? :

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर Realme 12x 5G मध्ये 50-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग शूटर देखील आहे. तसेच कंपनीने या स्मार्टफोनची अद्याप किंमत जाहीर केलेली नाही.

News Title- Realme 12X 5G India Launch Date

महत्त्वाच्या बातम्या –

कंगनानंतर ‘ही’ अभिनेत्रीही करणार राजकारणात एंट्री?, चर्चांना उधाण

मोठी बातमी! ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

धक्कादायक! अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार

टायगर अभी जिंदा है…! धोनीचा अप्रितम झेल, खेळाडूंसह सारेच अवाक्, Video

आज MI Vs SRH येणार आमने- सामने; विजयाचं खातं कोण उघडणार?