धक्कादायक! अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ayodhya Ram Mandir | देशातील पवित्र अशा अयोध्येतील राम मंदिर परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी तैनात असणाऱ्या पीएसी कमांडोवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

53 वर्षीय कमांडो राम प्रसाद यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राम मंदिर परिसरात गोळी चालल्याचा आवाज आल्यानंतर लगेच सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. याचवेळी राम प्रसाद यांच्या छातीवर गोळी लागली.

राम मंदिर परिसरात गोळीबार

घटनेनंतर त्यांना त्वरित विभागातील दर्शननगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर, लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. या घटनेमुळे अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) खळबळ उडाली आहे. हा गोळीबार नेमका कसा झाला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य राम मंदिराचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला देशभरातील दिग्गज उपस्थित होते. यानंतर भाविकांची दर्शनासाठी तिथे रोज गर्दी असते. अयोध्या आता पर्यटकांचंही आकर्षणाचं केंद्र बनलं आहे.

तैनात जवान गंभीर जखमी

अनेक पर्यटक भारतात आल्यावर राम मंदीराला (Ayodhya Ram Mandir) भेट देत आहेत. त्यामुळे येथे कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. असं असताना येथे गोळीबार कसा झाला, याबाबत प्रश्न केले जात आहेत. ही घटना चुकून झाली असल्याचं पोलिस अधीक्षकांनी म्हटलं आहे.

रामजन्मभूमी पोलिस स्टेशनचे एसओ देवेंद्र पांडे यांनी म्हटलं की, कमांडो रामप्रसाद आपली एके-47 रायफल साफ करत असताना अचानक गोळी झाडली गेली ही गोळी त्यांच्या छातीत घुसल्याने कमांडो गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेची आता देशभर चर्चा होत आहे.

News Title : Firing in Ayodhya Ram Mandir area PAC commando injured

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!

“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!

…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत