रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. हिटमॅन नेहमी खेळाडूंची खिल्ली उडवताना, त्यांच्यासोबत मस्ती करताना तर कधी माध्यमांच्या प्रतिनिधींची फिरकी घेताना दिसतो. सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. (IPL 2024) रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून काढल्यापासून तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. मुंबई प्रथमच हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळत आहे. (IPL 2024 News)

मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामातील आपला सलामीचा सामना गुजरात टायटन्सविरूद्ध रविवारी खेळला. गुजरातने 6 धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्सने आपली परंपरा कायम राखत सलामीचा सामना गमावला. खरं तर 2013 पासून मुंबईने एकदाही सलामीच्या सामन्यात विजय मिळवला नाही.

IPL 2024 चा थरार

मुंबईचा दुसरा सामना बुधवारी सनरायझर्स हैदराबादसोबत होणार आहे. यासाठी हार्दिकसेना हैदराबादला पोहोचली आहे. येथे सराव करत असताना रोहितने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी रोहितने हैदराबादचा आघाडीचा फलंदाज मयंक अग्रवालला फ्लाइंग किस दिल्याचे दिसले. रोहितचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सनरायझर्स हैदाराबादला आपल्या सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर यजमानांनी बाजी मारली. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने स्फोटक खेळी करत सामन्यात रंगत आणली पण अखेरच्या षटकात केकेआरच्या हर्षित राणाने सामना आपल्या संघाच्या नावावर केला.

 

Rohit Sharma चा फ्लाइंग किस

दरम्यान, मुंबईने पहिला सामना गुजरात टायटन्सविरूद्ध खेळला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत यजमान गुजरातने बाजी मारली. हा सामना आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील बहुचर्चित सामना ठरला. कारण हार्दिकने गुजरातच्या संघातून बाहेर पडत मुंबईच्या संघात घरवापसी केली.

पण, अहमदाबाद येथे प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमने हार्दिक पांड्याला आरसा दाखवला. रोहितला कर्णधारपदावरून काढल्यामुळे चाहते मुंबईचा कर्णधार हार्दिकला लक्ष्य करत आहेत. सोशल मीडियावर हार्दिकला ट्रोल केले जात आहे. तसेच अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात प्रेक्षकांनी हार्दिकसमोर आक्षेपार्ह घोषणा दिल्या.

News Title- IPL 2024 SRH vs MI Rohit Sharma giving a flying kiss to Mayank Agarwal
महत्त्वाच्या बातम्या –

“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!

…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत

बारामतीत उमेदवार बदलणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य