सलग दोन सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्स ठरला नंबर-1

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Teams Standings l चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या घरच्या मैदानावर उत्कृष्ट विक्रम कायम राखत आयपीएल 2024 पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली CSK ने 7 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 63 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला 20 षटकांत 8 गडी गमावून 143 धावा करता आल्या. त्यामुळे यंदाच्या IPL पर्वत CSK ने हा सलग दुसरा विजय मिळवून पॉईंट टेबलवर अव्वल स्थान पटकावले आहे.

IPL 2024 Teams Standings l शिवम दुबेचे वर्चस्व कायम :

गुजरात टायटन्सचा आयपीएलमधील सर्वात मोठा पराभव झाला आहे. हा संघ प्रथमच 63 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला आहे. याआधी गेल्या वर्षी गुजरातने मुंबईविरुद्धचा सामना 27 धावांनी गमावला होता.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचा मोका दिला आहे. त्याचा हा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांना चांगलाच जड गेला आहे. रचिन रवींद्रने शेवटच्या सामन्यासारखी झंझावाती सुरुवात केली.

 

IPL 2024 Teams Standings l चेन्नईने अव्वल स्थान गाठले :

मात्र अजिंक्य रहाणे 12 चेंडूत केवळ 12 धावा करू शकला आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या शिवम दुबेने 2 चेंडूत 2 षटकार मारून आपला इरादा व्यक्त केला. दुबेने 23 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. मात्र त्याआधी कर्णधार गायकवाडचे अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकले. गायकवाडने 36 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. अखेरीस डॅरेल मिशेलने 24 धावा केल्या आणि समीर रिझवीनेही 6 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले.

चेन्नईच्या संघाने सलग दोन वेळा विजय मिळवून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑरेंज कॅपबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली 98 धावांसह अव्वल स्थानावर आहे. तर मुस्तफिजुर रहमान 6 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

News Title- IPL 2024 Teams Standings

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!

“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!

…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत