Shivsena Thackeray group | आगामी लोकसभा निवडणुक आता तोंडावर आली आहे. भाजपासह सर्वच पक्ष उमेदवारांबाबत बैठका घेत आहे. कालच (26 मार्च)महाराष्ट्रात महायुतीमधील अजित पवार गटाने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. सुनिल तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, बाकीची यादी 28 तारखेला जाहीर करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
तर, आज 27 मार्चरोजी शिवसेना ठाकरे गटानेही आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 17 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये विद्यमान खासदार अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत यांच्यासह इतर नेत्यांची नावं आहेत.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर
बुलढाणा : प्रा. नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम : संजय देशमुख
मावळ : संजोग वाघेरे पाटील
सांगली : चंद्रहार पाटील
हिंगोली : नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे
धाराशीव : ओमराजे निंबाळकर
शिर्डी : भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक : राजाभाऊ वाजे
रायगड : अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी : विनायक राऊत
ठाणे : राजन विचारे
मुंबई-ईशान्य : संजय दिना पाटील
मुंबई -दक्षिण : अरविंद सावंत
मुंबई-वायव्य : अमोल कीर्तिकर
परभणी : संजय जाधव
दक्षिण मध्य : अनिल देसाई
खासदार संजय राऊत यांनी ही यादी जाहीर केली आहे. त्यांनी ट्वीटवर ही यादी जाहीर केली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
News Title : Shivsena Thackeray group first list of Lok Sabha candidates announced
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!
“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!
…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?
लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात
“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत