मोठी गुड न्यूज! सोन्याचे भाव उतरले; जाणून घ्या आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले तर चांदीने या आठवड्यात 2800 रुपयांची भरारी घेतली होती. आज (27 मार्च)सोने आणि चांदी दोन्हींच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

21 मार्च रोजी सोने आणि चांदीने तेजी घेतली होती.तर, 22 मार्च रोजी याच्या किंमती 450 रुपयांनी उतरल्या. तर 23 मार्च रोजी किंमती 110 रुपयांनी उतरल्या. या आठडव्यात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सोने-चांदीच्या किंमती घसरल्या

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 61,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज चांदीनेही दिलासा दिला आहे. चांदीच्याही किंमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.

18 मार्च रोजी 300 रुपयांनी चांदी (Gold-Silver Rate Today) स्वस्त झाली होती. तर, 19 मार्च रोजी पुन्हा त्यात वाढ झाली. 20 मार्च रोजी चांदीच्या किंमती 300 रुपयांनी कमी झाल्या. 21 मार्च रोजी पुन्हा 1500 रुपयांनी चांदी वधारली. तर, 22 मार्च रोजी चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली.

या आठवड्यामध्ये चांदी किंचित घसरली आहे. सोमवारी चांदी 300 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी 26 मार्च रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,500 रुपये झाला आहे.

कॅरेटचा भाव काय?

गुडरिटर्न्सनुसार (Gold-Silver Rate Today) 24 कॅरेट सोने 66,716 रुपये, 23 कॅरेट 66,449 रुपये, 22 कॅरेट सोने 61,112 रुपये झाले. 18 कॅरेट 50037 रुपये, 14 कॅरेट सोने 39,029 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold-Silver Rate Today) आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today 27 March

महत्वाच्या बातम्या-

रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!

“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!

…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत