मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. अनेकदा महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही समोर आलं नाही. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आता त्यांनी एक वेगळाच डाव खेळला आहे.

मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकर यांची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी घेतला. यामुळे आता लोकसभेच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांच्या नव्या आघाडीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेपर्यंत थांबण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) सांगितलं आहे.

प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे हे जागावाटप करणार आहेत. लोकसभेसाठी सर्वसामान्य गरीब लोकांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 एप्रिलपर्यंत असणार आहे.

अशी होणार आघाडी

प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मंगळवारी बैठक झाली. त्याची माहिती बुधवारी सकाळी समोर आली. राज्यामध्ये नवा राजकीय धमाका होणार असल्याचे संकेत निर्माण झाले आहेत. सकाळी 11.30 वाजता महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर यांनी मोठा झटका दिला. महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडं दुर्लक्ष केल्यादा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ही नवीन आघाडी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत करण्यात आली. वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्याला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत अंतिम निर्णय हा येत्या 30 तारखेला होणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीवर हल्ला

“लोकांना काय हवं आहे हे आम्हाला माहिती आहे. लोकांची नस आम्हाला माहिती आहे. लोकांना परिवर्तन हवं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमची एक सामाजिक आघाडी होत आहे. महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केलं”, असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

News Title – Prakash Ambedkar And manoj Jarange patil update

महत्त्वाच्या बातम्या

पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट, वसंत मोरेंची मोठी खेळी

आशिया चषक 2024 वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान हायहोल्टेज सामना

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट चर्चेत!

हिंदू नववर्ष सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व!

मोठी गुड न्यूज! सोन्याचे भाव उतरले; जाणून घ्या आजचे दर