आशिया चषक 2024 वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान हायहोल्टेज सामना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Womens Asia Cup 2024 Schedule Announced l आशियाई क्रिकेट परिषदेने महिला आशिया चषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. ही स्पर्धा श्रीलंकेतील डंबुला येथे आयोजित केली जाणार आहे. पहिला सामना 19 जुलै रोजी होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे संघ यंदा एकाच गटात आहेत. या वर्षीची सर्वात वेगळी बाब म्हणजे या हंगामात एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. गेल्या हंगामात या स्पर्धेत केवळ 7 संघ सहभागी होऊ शकले होते.

Womens Asia Cup 2024 Schedule Announced l या दिवशी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना :

अशातच या सीझनमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 21 जुलै रोजी महान सामना होणार आहे. भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि यूएई या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंडचे संघ आहेत. गेल्या वर्षी भारताने आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले होते. टीम इंडियाने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला होता.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “खेळाडू आणि चाहत्यांना प्रेरणा देणाऱ्या एका रोमांचक स्पर्धेची वाट पाहत आहोत. महिला T20 आशिया कप 2024 महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ACC ची वचनबद्धता अधोरेखित करते. या क्षेत्रातील सतत वाढत चाललेली स्पर्धा पाहून आम्ही खूप उत्सुक आहोत.”

Womens Asia Cup 2024 Schedule Announced l आशिया कप 2024 वेळापत्रक :

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – शुक्रवार 19 जुलै
भारत विरुद्ध UAE – शुक्रवार 19 जुलै
मलेशिया विरुद्ध थायलंड – शनिवार 20 जुलै
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – शनिवार 20 जुलै
नेपाळ वि UAE – रविवार 21 जुलै
भारत विरुद्ध पाकिस्तान – रविवार 21 जुलै
श्रीलंका विरुद्ध मलेशिया – सोमवार 22 जुलै
बांगलादेश विरुद्ध थायलंड – सोमवार 22 जुलै
पाकिस्तान विरुद्ध UAE – मंगळवार 23 जुलै
भारत विरुद्ध नेपाळ- मंगळवार 23 जुलै
बांगलादेश विरुद्ध मलेशिया – बुधवार 24 जुलै
श्रीलंका विरुद्ध थायलंड – बुधवार 24 जुलै
उपांत्य फेरी 1- शुक्रवार 26 जुलै
उपांत्य फेरी 2- शुक्रवार 26 जुलै
अंतिम – रविवार 28 जुलै

News Title- Womens Asia Cup 2024 Schedule Announced

महत्त्वाच्या बातम्या –

हिंदू नववर्ष सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व!

मोठी गुड न्यूज! सोन्याचे भाव उतरले; जाणून घ्या आजचे दर

प्रतीक्षा संपली! भन्नाट फीचर्ससह Realme 12x 5G स्मार्टफोन ‘या’ दिवशी लाँच होणार

कंगनानंतर ‘ही’ अभिनेत्रीही करणार राजकारणात एंट्री?, चर्चांना उधाण

मोठी बातमी! ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कुणा-कुणाला मिळालं तिकीट?