स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट चर्चेत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Swatantrya Veer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) हा सिनेमा 22 मार्च रोजी सर्वत्र देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची देशभरात चांगली चर्चा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: रणदीप हुड्डानं केलं आहे. या सिनेमामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी देशासाठी केलेली क्रांती, सावरकरांना देण्यात आलेली काळ्या पाण्याची शिक्षा, त्यांची कौटुंबिक परिस्थिती, देशातील जाती भेद, अखंड भारताबाबत सावरकरांचे विचार या सिनेमांच्या माध्यमातून दाखवण्यात आले. त्यावर आता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पोस्ट केली आहे.

मराठी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या चित्रपटांची देखील देशभरामध्ये चर्चा होते. सध्या देशभरामध्ये स्वातंत्र्यावीर सावरकर या सिनेमाची चर्चा आहे. त्यावर प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये प्रवीण तरडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा सर्वांनी पाहावा असा सिनेमा आहे. हा सिनेमा तडाखेबंद सिनेमा असल्याचं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

काय होती पोस्ट?

“॥ धर्मो रक्षति रक्षित:॥ अफाट अचाट आयुष्य जगलेल्या, जातीपातीला गाडण्यासाठी, झटलेल्या महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं, ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा”, अशी त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

रणदीप हुड्डानं या सिनेमासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. या भूमिकेसाठी त्याने आपल्या शरीरावर प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याचा अभिनय देखील महत्त्वपूर्ण आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र चित्रपटामध्ये महेश मांजरेकर आणि रणदीप हुड्डामध्ये काही मतभेद निर्माण झाले. यामुळे महेश मांजरेकर यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर रणदीपने अभिनय आणि दिग्दर्शन अशा दुहेरी भूमिका पेलल्या आहेत.

या सिनेमामध्ये हिंदी मालिका आणि बिग बॉसमधून प्रसिद्धिस आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनं देखील सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. सावरकरांच्या 1897 ते 1950 काळातील ही कथा आहे. यामध्ये सावारकारांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर भाष्य करण्यात आलं. राणदीप हुड्डानं नुकतीच एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये रणदीप हुड्डानं सावरकरांबाबत फारसं शाळेतंही शिकवलं नाही, म्हणून हा चित्रपट करण्याचं मी मनावर घेतलं असल्याचं म्हणाला.

काय म्हणाला रणदीप हुड्डा?

रणदीप हुड्डानं नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनं हा चित्रपट करण्या मागचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला की, “त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आल्याचं मला माहिती होतं. त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी शाळेत शिकवल्या नाहीत. त्यांच्याविषयी कोणीही काहीही बोललं नाही. त्यांचं नाव घेतल्या घेतल्या लोकं वादाला सुरूवात करतात. मला या गोष्टींचा राग होता म्हणून मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रणदीप हुड्डा म्हणाला.

News title – Swatantrya Veer Savarkar Film On Marathi Director Pravin Tarde Facebok Post

महत्त्वाच्या बातम्या

“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!

…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत

बारामतीत उमेदवार बदलणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य