पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट, वसंत मोरेंची मोठी खेळी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More | मनसेला रामराम ठोकल्यापासून वसंत मोरे चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं म्हटलं गेलं. यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्क लावले गेले. त्यातच आता वसंत मोरे यांनी मराठा समाजाच्या बैठकीत हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावली. त्यांनी पुण्यात सकल मराठा समाज आणि वंचितने सहकार्य करावं अशी भूमिका मांडली. मी पुण्यातून 100 टक्के खासदार होणार, असा निर्धारच त्यांनी केला आहे.

वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीला हजर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची बैठक घेण्याचं आवाहन केलं होतं. तसंच प्रत्येक मतदारसंघातून मराठा समाजाने एक उमेदवार द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. अशात वसंत मोरे (Vasant More) यांची बैठकीला उपस्थिती अनेक विषयांना मार्ग करून देत आहे.

वसंत मोरे मनोज जरांगे यांची घेणार भेट

आता वसंत मोरे (Vasant More) यांना मराठा समाज उमेदवार जाहीर करणार का?, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. वसंत मोरे महाविकास आघाडी किंवा अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढवणारच, असं म्हटलं आहे. त्यासाठीच त्यांनी मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही चाल चालवली असल्याची चर्चा आहे.

भाजपाने राष्ट्रवादी फोडून त्याचे दोन तुकडे केलेत. तशीच शिवसेनाही फोडली.या मुळे भाजपचा हा प्रकार थांबवण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे. ते येत्या 7 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत.

पुण्यात भाजपाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उमेदवार असणार आहेत. आता मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title- Vasant More attended the meeting of Maratha community

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी गुड न्यूज! सोन्याचे भाव उतरले; जाणून घ्या आजचे दर

प्रतीक्षा संपली! भन्नाट फीचर्ससह Realme 12x 5G स्मार्टफोन ‘या’ दिवशी लाँच होणार

कंगनानंतर ‘ही’ अभिनेत्रीही करणार राजकारणात एंट्री?, चर्चांना उधाण

मोठी बातमी! ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

धक्कादायक! अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार