या विभागात सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार; या तारखेपर्यंत अर्ज करू शकता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NPCIL Recruitment 2024 l न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (NPCIL) ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 335 रिक्तपदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 03 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. तर इच्छुक उमेदवार 04 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरू शकतात. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेवर अर्ज भरावा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन थेट अर्ज करावा लागणार आहे.

NPCIL Recruitment 2024 l शैक्षणिक पात्रता काय हवी?:

अर्जदार 10वी, 12वी उत्तीर्ण / पदवीधर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पात्र असावे. तसेच प्रत्येक विभाग नोकरीसाठी काही आवश्यक शैक्षणिक पात्रता ठरवली आहे. ती पदांवर आधारित आहे. तसेच इच्छुक उमेदवार ऑनलाइन स्वरूपाने अर्ज करू शकतात.

या विभागांमध्ये भरती केली जाणार :

NPCIL ने वेगवेगळ्या विभागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, टर्नर, मशीनिस्ट आणि वेल्डर यांचा समावेश आहे. याशिवाय उमेदवारांची वयोमर्यादा 14 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहेत. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्र :

– 10वी, 12वी उत्तीर्ण परीक्षेचा निकाल
– पदवीधर पदवी
– समतुल्य पात्रता प्रमाणपत्र
– आधार कार्ड
– जात पडताळणी प्रमाणपत्र
– रहिवासी दाखला
– आवश्यक असल्यास अनुभव प्रमाणपत्र
– एम्प्लॉयमेंट एक्सचेंज थेट नोंदणी प्रमाणपत्र
– पासपोर्ट फोटो

NPCIL Recruitment 2024 l या भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : मार्च 03, 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : एप्रिल 04, 2024

News Title- NPCIL Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या –

पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट, वसंत मोरेंची मोठी खेळी

आशिया चषक 2024 वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान हायहोल्टेज सामना

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट चर्चेत!

हिंदू नववर्ष सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व!

मोठी गुड न्यूज! सोन्याचे भाव उतरले; जाणून घ्या आजचे दर