SIP मध्ये जास्त फायदा हवा असेल तर या 4 गोष्टी लक्षात घ्या; होईल फायदाच फायदा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mutual Fund SIP Investment Benefits l तुम्हीही SIP मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एसआयपीमध्ये पैसे गुंतवले असतील किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. म्युच्युअल फंड एसआयपी द्वारे, तुम्ही लहान रक्कम घेऊनही मोठी रक्कम तयार करू शकता. तर एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात…

Mutual Fund SIP Investment Benefits l रिसर्च करा :

एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्यासाठी संशोधन करणे देखील महत्त्वाचे आहे. तसेच SIP घेण्यापूर्वी तुम्ही नेहमी संशोधन केले पाहिजे किंवा तुम्ही सल्लागाराचा सल्ला देखील घेऊ शकता. यातून तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात. यामुळे नुकसानीचे प्रमाण देखील कमी होईल. त्यामुळे SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी रिसर्च करणे गरजेचे आहे.

छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करा :

कोणत्याही नवीन गुंतवणुकीत तुम्ही थोड्या रकमेपासून सुरुवात करावी. जर तुम्ही मोठ्या रकमेने SIP सुरू केली तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. यासोबतच भविष्यात तुम्हाला कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करावा लागला तर तुम्हाला यामधून बाहेर पाडण्यासाठी SIP हा सर्वात्तम पर्याय असतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला छोट्या रकमेच्या 2 किंवा 3 SIP सुरू करू शकता.

Mutual Fund SIP Investment Benefits l SIP अचानक थांबवू नका :

बरेचदा असे दिसून येते की गुंतवणूकदार प्रथम उत्साही होऊ लागतात, परंतु नंतर मंदी आणि बाजारातील घसरण पाहून ते थांबवतात. मात्र हे करू नये, असे केल्याने गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागू शकते. तसेच मंदीच्या काळात गुंतवणूकदारांना धीर धरावा लागेल आणि प्रॉफिट आल्यानंतर तुम्ही त्यातून तुमचे पैसे काढू शकता.

प्रथम लक्ष्य निश्चित करा नंतर SIP सुरू करा

तुम्ही नेहमी लक्ष्य ठेवून SIP मध्ये गुंतवणूक सुरू करावी. मुलांचे लग्न, शिक्षण किंवा निवृत्तीसाठी तुम्ही SIP योजना करू शकता. तसेच तुम्हाला एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याला किती पैसे लागतील याचे बजेट तयार करा आणि त्यानंतर SIP मध्ये गुंतवणूक करा.

News Title- Mutual Fund SIP Investment Benefits

महत्त्वाच्या बातम्या –

या विभागात सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार; या तारखेपर्यंत अर्ज करू शकता

पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट, वसंत मोरेंची मोठी खेळी

आशिया चषक 2024 वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान हायहोल्टेज सामना

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट चर्चेत!

हिंदू नववर्ष सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व!