महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट; छगन भुजबळ लोकसभेची निवडणूक लढवणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली आहे. नाशिक जागेवर भाजप आणि शिवसेनेनं दावा केला होता. मात्र आता ही जागा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली आहे. त्याबैठकीला छगन भुजबळ रवाना झाले.

अजित पवार यांच्या बैठकीला भुजबळ रवाना

अजित पवार यांच्या पुण्यात माढा, सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक बैठकीसाठी छगन भुजबळ आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. भुजबळ यांच्यासह नाशिकचे अजित पवार गटातील काही पदाधिकारी आणि नेते मंडळी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.

भुजबळांची प्रतिक्रिया?

अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला छगन भुजबळ रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “ज्या जागा आम्हाला मिळणार आहे किंवा जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत अजित पवार यांनी बैठक घेतली आहे. पक्षाचा नेता म्हणून अजितदादा आढावा घेणार आहेत,” असं भुजबळ म्हणाले आहेत.

उमेदवारीवर प्रतिक्रिया

दिल्लातून उमेदवारी निश्चित झाली आहे असं विचारल्यानंतर भुजबळ यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, “मला कल्पना नाही मी पुण्याला गेल्यावर विचारतो. अनेकजण इच्छुक आहेत. आम्ही कोणावरही दबाव टाकला नाही”.

“मी राष्ट्रवादी पक्षात, माझ्या पक्षातर्फे लढणार, पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही. ज्या पक्षाला जागा सुटेल तो लढेल. ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला 100 टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार,” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

News Title – Chhagan Bhujbal On The Way Ajit Pawar Meeting About Nashik Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!

“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!

…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत