भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता; विद्यमान खासदार ठाकरेंच्या वाटेवर?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MP Unmesh Patil | भाजपसह सर्वच पक्षांमध्ये सध्या उमेदवारीवरून नाराजीचं सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बरेच उमेदवार जागेसाठी आस लावून बसले आहेत. आजच ठाकरे गटाने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर अजित पवार गटानेही आपला एक उमेदवार जाहीर केला आहे.

दुसरीकडे महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजपमध्येही जागेसाठी चढाओढ सुरू असल्याचं दिसत आहे. आता भाजपाला विद्यमान खासदार मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाने तिकीट कापल्यानंतर नाराज असलेले खासदार उन्मेष पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

खासदार उन्मेष पाटील नाराज?

उन्मेष पाटील आता उद्धव ठाकरे गटात जाण्याची दाट शक्यता आहे. उन्मेष पाटील यांच्या पत्नीस जळगाव लोकसभा मतदार संघातून ठाकरे गट उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. भाजपाने या ठिकाणी स्मिता वाघ यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले आहेत.

उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या पत्नी संपदा पाटील जळगाव लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीविरोधात त्या ठाकरे गटाकडून आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. आजच शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या सतरा जणांच्या उमेदवारी यादीत जळगाव लोकसभेतून उमेदवारीबाबत सस्पेन्स ठेवला गेला आहे. त्या ठिकाणी संपदा पाटील उमेदवार असू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.

जळगाव सीटवरून नाराजी

त्यामुळे भाजपाला धक्का देत उन्मेष पाटील लवकरच ठाकरे गटात पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. संपदा पाटील ठाकरे गटाकडून रिंगणात उतरल्यास दोन प्रमुख महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. जळगाव सीटसाथीठी पाटील ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) हे भाजपाच्या तिकिटावर चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून आमदार झाले होते. 2019 मध्ये त्यांना भाजपाने लोकसभा मतदार संघाचं तिकीटही दिलं. त्यांचा दणदणीत विजय झाला. आता ते भाजपाविरोधातच बंड करण्याच्या तयारीत आहेत.

News Title- Talks of MP Unmesh Patil joining Thackeray group

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी

SIP मध्ये जास्त फायदा हवा असेल तर या 4 गोष्टी लक्षात घ्या; होईल फायदाच फायदा

या विभागात सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार; या तारखेपर्यंत अर्ज करू शकता

पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट, वसंत मोरेंची मोठी खेळी

आशिया चषक 2024 वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान हायहोल्टेज सामना