पत्नीला सेकंड हँड म्हणणं पतीला पडलं महागात, भरावा लागला इतका दंड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Women Harassement | नवरा आणि बायको यांच्या नात्यामध्ये वाद-विवाद नेहमी होत राहतात. झालेल्या वादानंतर पुन्हा पती आणि पत्नी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने संसार करतात. मात्र भांडताना असे काही शब्द बोलले जातात. ते थेट मनातील वेदनांचा वेध घेतात. शब्दाने झालेली जखम पटकन बरी होत नाही आणि यातून भांडण वाढू लागतं. अशीच एक घटना समोर आली आहे. पती आपल्या पत्नीला सेकंड हँड म्हणाला. यामुळे आता ते पतीच्या अंगलट आलं आहे.

आपल्या पत्नीला पतीनं सेकंड हँड म्हणल्याने पत्नीला महिन्याला दीड लाख रूपये आणि तीन कोटी रूपये भरपाई देण्यात यावे, असे आदेश आरोपी पतीला न्यायालयाने दिले आहेत. (Women Harassement)

काय आहे प्रकरण?

1994 मध्ये पीडित पत्नी आणि पती हे नेपाळला हनिमूनसाठी गेले होते. तेव्हा त्या पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तेव्हा तिला पती सेकंड हँड म्हणाला. तिचा पतीशी विवाह होण्याआधी पहिला साखरपूडा झाला होता. त्यानंतर काही कारणास्तव साखपूड्यानंतर तो विवाह मोडला गेला. त्यानंतर तिचं लग्न झालं आणि ते दोघेही अमोरिकेला गेले. अमेरिकेमध्ये लग्नसोहळा केला.

काही दिवसांनी पीडित पत्नीला पतीने मारहाण (Women Harassement) करण्यास सुरूवात केली. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खोटे आरोप करू लागला. त्यानंतर ते दोघेही 2005 मध्ये मुंबईमध्ये आले आणि संयुक्त मालकी हक्काच्या घरामध्ये राहू लागले आहेत. 2008 साली पीडित पत्नी तिच्या माहेरी राहण्यासाठी गेली. त्यानंतर पुन्हा पती 2014 मध्ये अमेरिकेला गेला.

3 कोटी रूपये भरपाई आणि दीड लाख रूपयांची पोटगी

पीडित महिलेनं 2017 मध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली. पीडितेनं केलेल्या आरोपाला तिचा भाऊ, बहिण आणि काकाने दुजोरा दिला आहे. पीडित महिला घरगुती हिंसाचाराची (Women Harassement) बळी पडली असल्याचं न्यायालयाने मान्य केलं आहे. 2023 मध्ये न्यायालयाने आरोपी पतीला 3 कोटी रूपये भरपाई आणि दीड लाख रूपयांची पोटगी देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने पतीला दिला आहे.

पतीची हायकोर्टात याचिका दाखल

पत्नीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. याविरोधात पतीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. ही भरपाई केवळ शारीरिक नाहीतर मानसिक आणि भावनिक त्रासाची भरपाई आहे. (Women Harassement)

News Title – Women Harassement Case In Husband Tount His Wife Second Hand

महत्त्वाच्या बातम्या

कंगनानंतर ‘ही’ अभिनेत्रीही करणार राजकारणात एंट्री?, चर्चांना उधाण

मोठी बातमी! ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

धक्कादायक! अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार

टायगर अभी जिंदा है…! धोनीचा अप्रितम झेल, खेळाडूंसह सारेच अवाक्, Video

आज MI Vs SRH येणार आमने- सामने; विजयाचं खातं कोण उघडणार?