“नुसत्याच निष्ठेच्या बाता…,”; रूपाली पाटील ठोंबरेंचा अमोल कोल्हेंना टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shirur Loksabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राज्याचं लक्ष लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाकडे लागलं आहे. लोकसभा निवडणुकीचं घोडेमैदान आता लांब राहिलं नाही. बारामतीप्रमाणे आता शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत शिवाजी आढळराव पाटील यांनी पक्षप्रवेश केला. त्यावेळी अजित पवार यांनी अमोल कोल्हे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

काल आढळराव पाटील यांनी पक्षप्रवेश केला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, शिवाजी आढळराव पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणायचं आहे. ही गावकीची आणि भावकिची निवडणूक नाही. आता माझ्या बाबतीत काहींना गावकीची निवडणूक केली आहे. मी त्यांना बघून घेतो, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता समाचार घेतला आहे. त्यावर शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. (Shirur Loksabha)

रूपाली पाटील यांची पोस्ट

ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या संघर्षाच्या काळामध्य़े मी उभा आहे. याला निष्ठा म्हणतात, असं ते म्हणाले आहेत. त्याला रूपाली पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वकर्तुत्व? नुसत्याच निष्ठेच्या मोठया मोठया बाता ……,” अशी पोस्ट सोशल मीडियावर रूपाली पाटील यांनी केली आहे. (Shirur Loksabha)

फोटोंचा संदर्भ देत अमोल कोल्हेंवर हल्ला

त्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांचा रूपाली पाटील यांनी समाचार घेतला आहे. पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी आधी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला, त्यानंतर उद्धव ठाकरे पक्षासोबत गेले, त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, त्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीला गेले, शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांसोबत आले, नंतर अजितदादांची साथ सोडली आणि शरद पवार यांच्यागटामध्ये गेले, असे संदर्भ दिलेले काही फोटो रूपाली पाटील यांनी पोस्ट केले आहेत. (Shirur Loksabha)

कोल्हेंच्या निष्ठेवर रूपाली पाटील यांनी ठेवलं  बोट

अमोल कोल्हे अनेक पक्षातून शेवटी शरद पवार यांच्या गटामध्ये आले. त्यावर रूपाली पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. “स्वकर्तुत्व? नुसत्याच निष्ठेच्या मोठया मोठया बाता…”, असं म्हणत अमोल कोल्हे यांना सनावलं आहे. अनेक पक्ष सोडल्यानं एकाही पक्षामध्ये अमोल कोल्हे यांना राहता आलं नसल्यानं अमोल कोल्हे यांच्या निष्ठेवरून रूपाली पाटील यांनी खडे बोल सुनावलं.

काही महिन्यांआधी अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्याविरोधात मी उमेदवार देणार. कोल्हेना पाडणार म्हणजे पाडणार असं खुलं आव्हान दिलं होतं. आता निवडणुकीचं घोडेमैदान फार लांब नाही, आता शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे (Shirur Loksabha) अवघ्या राज्याच्या नजरा लागल्या आहेत.

News Title – Shirur loksabh Candidate Amol Kolhe Against Rupali Patil Share Social Media Post

महत्त्वाच्या बातम्या

हिंदू नववर्ष सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व!

मोठी गुड न्यूज! सोन्याचे भाव उतरले; जाणून घ्या आजचे दर

प्रतीक्षा संपली! भन्नाट फीचर्ससह Realme 12x 5G स्मार्टफोन ‘या’ दिवशी लाँच होणार

कंगनानंतर ‘ही’ अभिनेत्रीही करणार राजकारणात एंट्री?, चर्चांना उधाण

मोठी बातमी! ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कुणा-कुणाला मिळालं तिकीट?