समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) नेहमी माणसाला त्याच्या आयुष्याबाबत मार्गदर्शन करत असतात. ते नेहमी आपल्या आयुष्यामध्ये कोण चांगलं कोण वाईट? कोण खरं कोण खोटं? याबाबत चाणक्य नेहमी सांगत असतात. आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी सांगितलेल्या नितीचा माणसाने अवलंब करावा असं सांगितलं जातं. अशातच आता चाणक्य यांनी खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना कसं ओळखता येईल याबाबत सांगितलं आहे.

मानवाच्या जीवनामध्ये अनेक खोटी लोकं येत असतात. त्यांना खऱ्याचं खोटं अन् खोट्याचं खरं करायची सवय असते. मात्र अनेकदा खोटेपणा आपल्या लक्षात येत नाही. त्याबाबत आता चाणक्य (Chanakya Niti) यांनी खोटारडा माणूस कसा ओळखावा याबाबत टीप्स दिल्या आहेत.

देहबोलीतून समजते

एखादा माणूस खोटे बोलत असेल तर त्याच्या देहबोलीतून समजतं असं चाणक्यनीती सांगते. त्याच्या बोलण्यातून समजतं की एखादा माणूस खरं बोलत आहे की खोटं. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या आवाजामध्ये बदल जाणवतो. खोटी बोलणारी लोकं मोठ्यानं बोलू लागतात. ते बोलताना अडखळतात. अशावेळी समजून जावं की ही व्यक्ती खोटी बोलत आहे. यावेळी चाणक्यनीती (Chanakya Niti) सांगते की अशा लोकांपासून चार हात लांब राहावं.

हातवाऱ्यावरून व्यक्ती खरं बोलते की खोटं बोलते हे समजतं

खोटं बोलणारी व्यक्ती तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी सांगतात. एखादी घडलेली घटना ती गोष्टीच्या स्वरूपात सांगतली जाते. समोरील व्यक्तीच्या हातवारेवरून ती व्यक्ती खरं बोलते की खोटं हे लगेच समजतं.

गोंधळलेला चेहरा

खोटं बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेकदा भिती दिसते. आपला खोटारडेपणा उघडकीस येईल अशी भिती त्यांच्या मनामध्ये असते. त्यामुळे ते अनेकदा इकडून तिकडं तिकडून इकडं फिरू लागतात. त्यांचा चेहरा गोंधळलेला दिसतो.

खरी बोलणारी व्यक्ती झटकेपट उत्तर देते. खोटं बोलणारी व्यक्ती उत्तर देताना खूप विचार करते आणि उत्तर देते असं चाणक्यनीती सांगते. तसेच खरी बोलणारी व्यक्त डोळ्यात डोळे घालून उत्तर देते. खोटं बोलणारी व्यक्ती कधीच आय कॉन्टॅक्ट करू शकत नाही.

News Title – Chanakya Niti Get Tips About Fake Peoples

महत्त्वाच्या बातम्या

मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर अन् वसंत मोरे दिसले एकत्र, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

“नुसत्याच निष्ठेच्या बाता…,”; रूपाली पाटील ठोंबरेंचा अमोल कोल्हेंना टोला

सुनेत्रा पवारांची अजित पवारांसाठी खास पोस्ट, म्हणाल्या…

सिनेमात काम करणार?; अमित ठाकरेंनी अखेर सांगूनच टाकलं

“जनतेच्या मनातील मोदी कसे पुसणार?”, रक्षा खडसेंचा नणंद रोहिणी खडसेंना टोला