‘दादर स्टेशन उडवून टाकू’, धमकीच्या फोन कॉलने खळबळ

Mumbai Dadar Station | मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरातील महत्त्वाचं रेल्वे स्टेशन म्हणून दादर रेल्वे स्थानकाकडं (Mumbai Dadar Station) पाहिलं जातं. पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारं रेल्वे स्थानक म्हणजे दादर रेल्वे स्थानक (Mumbai Dadar Station) आहे. सकाळी पहाटे 4 वाजता असो वा रात्री 1 वाजता दादर रेल्वेस्थानक (Mumbai Dadar Station) नेहमी प्रवाशांनी गजबजलेलं असतं. मात्र आता दादर स्टेशनला उडवून टाकण्याचा मध्यरात्री एक धमकी देणारा फोन कॉल आला. रात्री 112 या हेल्पलाईनवर एका अज्ञात इसमाने फोन करून दादर स्टेशन उडवण्याची धमकी दिली.

धमकीचा कॉल करणारी व्यक्ती आली समोर

ही माहिती पोलिसांना समजताच पोलिस सतर्क झाले आहेत. BDDS पथकासह रेल्वे स्थानक पिंजून काढायचं काम केलं आहे. मात्र कोठेही संशयास्पद माहिती समोर आली नाही. धमकीचा कॉल करणाऱ्या पोलिसांना सुटकेचा श्वास घेतला आहे. विकास शुक्ला नामक व्यक्तीने धमकीचा काॉल केला होता.

वसईच्या पेल्हार पोलिसांनी आरोपी विकास शुक्लाला ताब्यात घेतलं आहे. त्याने धमकीचा कॉल का केला होता? यामागे नेमकं कारण काय? यामागील मुख्य हेतू काय? यामागे कोणी आहे का? याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.

याआधी मुंबईच्या काही रेल्वे स्थानकावर बाॅम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली. वर्षभरापूर्वी डिसेंबर महिन्याच्या कुर्ला, दादर, सीएसटी रेल्वेस्थानकावर बाॅम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. (Mumbai Dadar Station)

दारूच्या नशेत आरोपीनं केला धमकीचा फोन

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करून या तीन ठिकाणी बाॅम्ब हल्ले करण्याची धमकी दिली जात होती. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा तपास केला. तो औरंगाबाद येथील वाळूंज येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

दारूच्या नशेमध्ये आरोपीनं हे कृत्य केलं असल्याची माहिती तपासातून पोलिसांनी समोर आणली आहे. यामुळे दादर रेल्वेस्थानकावर या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

News Title – Mumbai Dadar Station Bomb Spot Threatening Call

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांनो… सी लिंकवर प्रवास करणे महागले, टोल शुल्कात तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका!

चाणक्याचे ‘हे’ 5 मंत्र फॉलो करा; व्यवसायात येईल भरभराटी!

अखेर विराट- गौतमचे झाले पॅच अप! मिठी मारून दिल्लीकरांची मने जिंकली

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी