मोठी बातमी! नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक

Nawab Malik Health

Nawab Malik Health | गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती (Nawab Malik Health) चिंताजनक आहे. वैद्यकीय कारणामुळे ते तुरूंगाबाहेर आले आहेत. मलिक यांची प्रकृती बिघडल्याची (Nawab Malik Health) माहिती समोर आली आहे. मुलगी सना मलिकने ही माहिती दिली आहे.

कुर्ला येथील रूग्णालयामध्ये त्यांना अपत्कालीन कक्षेमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष देऊन आहे. त्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागला आहे. ते आता रूग्णालयामध्ये दाखल झाले आहेत.

दाऊद इब्राहीमसोबत नवाब मलिक यांचा संबंध

नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमसोबत नवाब मलिक यांचा संबंध होता. दाऊद इब्राहीमशी अर्थिक व्यवहार करण्याच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. ते याप्रकरणामध्ये तुरूंगात होते. मात्र सध्या मलिक यांची प्रकृती (Nawab Malik Health) चिंताजनक असल्यानं त्यांनी वैद्यकीय जामीन स्विकारला असून त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नवाब मलिक (Nawab Malik Health) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते मोठे मंत्री देखील राहिलेले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी अजित पवार यांना साथ देण्याबाबत निर्णय घेतला होता. काही महिन्यांआधी ते तुरूंगातून बाहेर आले आहेत. ते पक्षाच्या आणि इतर कार्यक्रमांमध्ये फारसे दिसले नाहीत.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्जप्रकरणात नवाब मलिक हे चांगलेच चर्चेत आले होते. एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.

अजित पवार गटाच्या बाजूनं…

नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आणि ते तुरूंगातून बाहेर आले. राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली. त्यामुळे ते कोणत्या गटात सामिल होणार याबाबत प्रश्न होता. त्यांनी सुरूवातीला तटस्थ भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या बाजूनं लढण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता.

News Title – Nawab Malik Health Update

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्याची मुलगी आहे सर्वात श्रीमंत; संपत्ती ऐकून व्हाल थक्क

पांड्याला धक्का?; रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार?

IPL च्या हंगामात वेंकटेश अय्यरने मारला सर्वात लांब षटकार; Video तुफान व्हयरल

मुंबईकरांनो… सी लिंकवर प्रवास करणे महागले, टोल शुल्कात तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .