लखनऊ विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक, आज पंजाबविरुद्ध रंगणार सामना

LSG vs PBKS match IPL 2024

LSG vs PBKS | आयपीएल 2024 हंगामातील 11 वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. लखनऊमधील प्रसिद्ध एकना क्रिकेट स्टेडियमवर रात्री 7 : 30 वाजता हा सामना खेळवला जाईल.

एलएसजीने लीगमध्ये आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. गेल्या आठवड्यात त्यांचा सामना सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यासाठी ते जयपूरला गेले होते. सोबत झाला होता. सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसनने शानदार अर्धशतक झळकावल्यामुळे यजमानांनी 20 षटकांत 4 बाद 193 धावा केल्या.

राजस्थानच्या प्रत्युत्तरात सुपर जायंट्सने पहिल्या चार षटकांत तीन गडी गमावले. कर्णधार केएल राहुल आणि निकोलस पूरन यांच्यात 52 चेंडूत 85 धावांची भागीदारी झाली. पण लखनऊला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून 20 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

LSG vs PBKS सामना

आता हंगामातील पहिला विजय मिळवायचा झाल्यास, लखनऊच्या गोलंदाजांना पंजाबविरुद्ध प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. आज होणारा सामना हंगामातील लखनऊचा हा दुसरा, तर पंजाबचा तिसरा सामना असेल.

दुसरीकडे, पंजाबने चंदिगढ येथे झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला नमवलं होतं. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडून हार पत्करावी लागली. लखनऊविरुद्ध विजयी पुनरागमनाचा त्यांचा प्रयत्न असेल. तर लखनऊ पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल. आता आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

लखनऊ सुपर जायंट्स ( (LSG) : केएल राहुल (c & wk), क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर,
इम्पॅक्ट प्लेयर : आयुष बडोनी (LSG vs PBKS )

पंजाब किंग्स (PBKS): शिखर धवन (c), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (wk), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेयर : प्रभसिमरन सिंग

News Title : LSG vs PBKS match IPL 2024

महत्त्वाच्या बातम्या-

तूळ राशीसह या 3 राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

कोरोना काळात ताट, वाट्या, थाळ्या का वाजवायला लावल्या?, मोदींचा सर्वात मोठा खुलासा

बॅालिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत कंगनाने केली स्वतःची बरोबरी!

मित्रानं ऐनवेळी घेतली माघार!, शरद पवार आता काय निर्णय घेणार?

जास्त मीठ खाणं ठरु शकतं घातक, आजच पाहा कमी मीठ खाण्याचे फायदे

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .