बॅालिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत कंगनाने केली स्वतःची बरोबरी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | बॅालिवूड अभिनेत्री कंगना रानौतला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी दिली. कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बाॅलिवूड अभिनेत्री उर्मीला मातोंडकर हिच्यावर कंगनाने 2020 मध्ये अक्षेपार्ह टिपण्णी केली होती. उर्मीलाला स्फाॅट पार्नस्टार म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कंगनाने अभिनेत्री सनी लिओनीवर निशाणा साधला. पाॅर्न स्टार काय असतं हे सनीला जाऊन विचारा असं कंगना म्हणाली होती. मात्र, आता कंगनाने स्वतःची तुलना एका दिग्गज अभिनेत्यासोबत केली आहे.

काय आहे प्रकरण?

राजकारणात एन्ट्री करण्याबाबत कंगनाने (kangana ranaut) खुलासा केला. गेल्या अनेक वर्षांपासून माझे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर हिट ठरत नव्हते. त्यामुळे मी, राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला माझे चित्रपट हिट ठरत होते मात्र, नंतर बाॅक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॅाप ठरत गेले. पुढे ती म्हणाली की, या जगात असा एकही अभिनेता नाही ज्याचे चित्रपट कधीच फ्लॉप झाले नसतील.

पुढे ती म्हणाली की, शाहरुखने 10 वर्षात एकही हिट दिला नव्हता, मग त्याचा ‘पठाण’ सिनेमा आला. माझे सिनेमे 7-8 वर्षे चालले नाही, नंतर ‘क्वीन’ (kangana ranaut) हिट झाला. मग पुन्हा 3-4 वर्षे सिनेमे हिट झाले नाहीत आणि ‘मणिकर्णिका’ हिट झाला. आता ‘इमर्जेन्सी’ चित्रपट येत आहे, मला आशा आहे की तो चालेल.”

ओटीटीवर कोणतेही स्टार्स नाहीत-

ओटीटीमुळे कलाकारांना आपलं कौशल्य दाखवायची संधी मिळत आहे, असं विधान कंगनाने (kangana ranaut) केलं. “आजकाल ओटीटीमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याच्या अधिक संधी आहेत. स्टार्सची आमची शेवटची पिढी आहे. ओटीटीमध्ये कोणतेही स्टार्स नाही. आम्ही लोकांच्या ओळखीचे चेहरे आहोत आणि आम्हाला खूप मागणी आहे, पण ओटीटीचं असं नाही,” असं कंगना म्हणाली.

काँग्रेस नेते एकत्र-

दुसरीकडे कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर एकमेकांशी भांडणारे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. इतकंच नव्हे तर हिमाचल प्रदेशातील दोन मोठ्या राजघराण्यांचीही कंगनाविरोधात छुपी एकजूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title : kangana ranaut compares with srk

महत्त्वाच्या बातम्या-

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट द्या!

अरे व्हा! भन्नाट फीचर्ससह Xiaomi कंपनीने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

20 मिनिटांत देखील 2 किमी धावू शकला नाही; पाकिस्तानी खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल

सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!

पुण्याच्या जागेवर वसंत मोरेंचा नवा डाव, ‘या’ पक्षाचं तिकीट फायनल?