पुण्याच्या जागेवर वसंत मोरेंचा नवा डाव, ‘या’ पक्षाचं तिकीट फायनल?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More | राज ठाकरे यांच्याशी एवढी वर्षे निष्ठा राखलेले वसंत मोरे यांनी अखेर मनसेला रामराम ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. पुण्याची निवडणूक एकतर्फी कशी होते, ते बघतोच. असा निर्धारच मोरे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केल्यावर वसंत मोरे अपक्ष लढणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, आता त्यांनी सर्वच शक्यता मोडीत काढत मोठी खेळी खेळली आहे. वसंत मोरे आज 29 मार्च रोजी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेणार आहेत. वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.

वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांची घेणार भेट

त्यांनी कालच पिंपरीत बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली होती. तर आज ते थेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. आंबेडकर स्वतः अकोला मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि मराठा आंदोलक यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यातच आता वसंत मोरे (Vasant More) प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार असल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीलाही हजेरी लावली होती. त्यांनी पुण्यात सकल मराठा समाज आणि वंचितने सहकार्य करावं अशी भूमिका मांडली होती.

वसंत मोरे वंचितकडून लढणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची बैठक घेण्याचं आवाहन केलं होतं. तसंच प्रत्येक मतदारसंघातून मराठा समाजाने एक उमेदवार द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. अशात वसंत मोरे (Vasant More) यांची बैठकीला उपस्थिती अनेक विषयांना मार्ग करून गेली.

यामध्ये अजून एक भर म्हणजे ते आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. आता वसंत मोरे (Vasant More) यांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे. त्यासाठीच ते प्रकाश आंबेडकर यांना भेटणार असल्याचं म्हटलं जातंय. या भेटीत काय ठरतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News Title : Vasant More will meet Prakash Ambedkar

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद

हार्दिक पांड्याला संघातून काढणार?, ‘या’ तडाखेबाज खेळाडूमुळे हार्दिकचं करिअर सापडलंय संकटात

चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण

‘राम सातपुते खोट्या गरिबीचा…’; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Hardik Pandya सारखा का धरतो स्वतःच्या गोलंदाजीचा आग्रह?, T20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर