Hardik Pandya | मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या नेटकऱ्यांच्या चांगलाच निशाण्यावर आहे. मुंबईने IPL 2024च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये मोठ्या पराभवाचं तोंड पाहिलं आहे आणि मुंबईच्या इंडियन्स संघाच्या चाहत्यांच्या मते या पराभवांना फक्त आणि फक्त हार्दिक पांड्याच जबाबदार आहे. अशा पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याच्या खांद्यावरील जबाबदारी आता आणखी वाढली आहे, मात्र हार्दिकच्या आगामी करिअरबद्दल एक धक्कादायक चर्चा सध्या क्रिकेटच्या वर्तुळात सुरु झाली आहे.
हार्दिक पांड्याचं करिअर पाहिलं तर त्याला जास्त करुन तिरस्काराचाच सामना करावा लागला आहे. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन काढण्याचा निर्णय झाला आणि त्याच्या जागी अचानक हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं. मुंबईच्या चाहत्यांना हा बदल मान्य नव्हता. संघाच्या निर्णयाला चाहत्यांनी सोशल मीडियातून जोरदार विरोध केला, मात्र मुंबईच्या संघाने या विरोधाकडे फारसं लक्ष दिलं नाही, परिणामी आता हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, त्यातच आता हार्दिकला भारतीय क्रिकेट संघातून डच्चू मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे.
नेमकी का सुरु झाली ही चर्चा-
हार्दिक पांड्या सध्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे. आयपीएल झाल्यानंतर लगेच टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धा पार पडणार आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते, अशी जोरदार अटकळ बांधली जात आहे. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर असेल म्हणजेच रोहित कर्णधार असेल, असं सांगितलं जातंय. त्यामुळे हार्दिकच्या कर्णधार बनण्याची चर्चा संपुष्टात आली आहे.
भारतीय संघातील खेळाडू म्हणून हार्दिकचा विचार करायचा झालं तर हार्दिक ऑलराऊंडर खेळाडू या प्रकारात मोडतो. तो ज्या प्रकारात मोडतो त्या प्रकारात सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा असल्याचं दिसत आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी हार्दिकची थेट स्पर्धा आहे ती सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणाऱ्या शिवम दुबेसोबत…
हार्दिक पांड्या की शिबम दुबे?
शिवम दुबेची (Shivam Dube vs Hardik Pandya) गेल्या काही दिवसातील कामगिरी पाहिली तर तो हार्दिक पांड्याला जोरदार स्पर्धा देताना दिसत आहे. दुबेच्या गोलंदाजीला सुद्धा चांगलीच धार चढलेली आहे आणि त्यातच त्याने आपल्या बॅटच्या सहाय्याने सुद्धा स्फोटक फलंदाजी चालवलेली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये शिवम दुबेने केलेली कामगिरी पाहता हार्दिकसाठी ही नक्कीच एक धोक्याची घंटा आहे.
RCB विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात शिवम दुबेने (Shivam Dube) नाबाद 28 चेंडूत 34 धावा चोपल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून दिला होता, दुसऱ्या सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 23 चेंडूत 51 धावा चोपल्या होत्या. दोन्ही सामन्यात त्याला गोलंदाजी मिळाली नव्हती. मात्र तो गोलंदाजीसाठी सुद्धा एक चांगला पर्याय मानला जात आहे, तसाही भारतीय संघात हार्दिक पांड्या पूर्णवेळ गोलंदाज नसेल आणि टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात पुरेशा गोलंदाजांचा भरणा असेल, अशा परिस्थितीत हार्दिकला संघातून डच्चू मिळू शकतो, अशी नवी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनासोबत चांगले संबंध-
दुसरीकडे हार्दिकच्या भारतीय संघातील स्थानाबाबत चर्चा सुरु असली तरी हार्दिकचे भारतीय संघ व्यवस्थापनासोबत (Team India) चांगले संबंध असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी झाली नाही हार्दिकसाठी हे संबंध काहीच कामाचे ठरणार नाही. अजून तरी हार्दिकला गोलंदाजी किंवा फलंदाजी या दोन्ही प्रकारांमध्ये लय सापडल्याचं दिसत नाही, त्यामुळे यंदाच्या आयपीएलवरच हार्दिक पांड्याचं भवितव्य अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे.
ही बातमीसुद्धा वाचा- Hardik Pandya सारखा का धरतो स्वतःच्या गोलंदाजीचा आग्रह?, T20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर
-बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली तर तुमच्या मित्रांना तसेच WhatsApp ग्रुपवर शेअर करा
News Title: Mumbai Indians Hardik Pandya new update
महत्त्वाच्या बातम्या-
चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण
‘राम सातपुते खोट्या गरिबीचा…’; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
पुरुषांपेक्षा महिलांना ‘या’ गोष्टीची जास्त सवय; धक्कादायक अहवाल समोर!
CBI चा राष्ट्रवादीच्या नेत्याला मोठा दिलासा; 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट