CBI चा राष्ट्रवादीच्या नेत्याला मोठा दिलासा; 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट

CBI | महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सुरु असलेल्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयने आता बंद केल्याची माहिती समोर येत आहे.

प्रफुल्ल पटेल यांना CBI चा दिलासा

प्रफुल्ल पटेल यांच्यावर यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपांनुसार, प्रफुल्ल पटेल यांच्यावर सरकारचं 840 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

जवळपास सात वर्षांच्या चौकशीनंतर सीबीआयने हे प्रकरण अधिकृतपणे बंद केलं आहे. तपास यंत्रणेने प्रफुल्ल पटेल आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाच्या माजी अधिकाऱ्यांनाही क्लीन चिट दिली आहे. सीबीआयने मार्च 2024 मध्ये सक्षम न्यायालयासमोर क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठी घडामोड ठरतोय. कारण प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते मानले जातात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं.

हे बंड झालं तेव्हा जे नेते अजित पवार यांच्यासोबत होते त्यामध्ये पटेल हे पहिले नेते होते. यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितला आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना-एकनाथ शिंदे कॅम्प सोबत सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी केली होती.

दरम्यान, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सकडून कारवाई झालेल्या अनेक जणांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांच्यावरील आरोप खोटे ठरले किंवा त्यांच्यावर पुढे कारवाई होत नाही, असा दावा विरोधकांकडून आतापर्यंत केला जातोय. प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत देखील तसंच घडताना दिसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राजीनामा देताना नवनीत राणा ढसाढसा रडल्या!

अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

सर्वात मोठी बातमी! पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदारानं घेतलं विष

‘निवडणूक लढवायला माझ्याकडे पैसे नाहीत’, निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य चर्चेत

भन्साळींची बहुचर्चित ‘हीरामंडी’ सीरिज ‘या’ दिवशी होणार रिलीज!