‘निवडणूक लढवायला माझ्याकडे पैसे नाहीत’, निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य चर्चेत

Nirmala Sitharaman | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या नाहीतर देशाच्या राजकारणामध्ये अनेक बदल होऊ लागले आहेत. कधी कोणता ट्वीस्ट निर्माण होईल हे सांगता येत नाही. भाजपची सातवी यादी जाहीर करण्यात आली. तसेच भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली आहे. अशातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या विधानानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी माझ्याकडं निवडणूक लढवायला पैसे नाहीत, असं वक्तव्य केलं. त्याची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते. पैसे नसल्यानं निवडणूक लढण्यासाठी नकार दिला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी हे वक्तव्य केलं होतं.

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र निर्मला सितारमण यांनी तो प्रस्ताव धुडकवला आहे. आपल्याकडे पैसे नसल्यानं निर्मला सीतारमण यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.

आंध्रप्रदेश किंवा तमिळनाडूतून निवडणूक लढणार

निर्मला सीतारमण यांना आंध्रप्रदेश किंवा तमिळनाडू येथून निवडणूक लढवण्याची संधी होती. जे.पी. नड्डा यांनी यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव देखील मांडला होता. त्याबद्दल मी दहा दिवस विचार केला आणि निवडणूक लढण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

“माझा पगार ही माझी सेव्हिंग”

निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचं निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत. त्यावर विचारण्यात आलं की, तुम्ही देशाचे अर्थमंत्री आहात तुम्ही पैसे नसल्याचं म्हणत आहात? यावर आता सीतारमण म्हणाल्या की, “देशाचा निधी आहे माझा निधी नाही. माझा पगार ही माझी सेव्हिंग आहे”, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.

“निवडणुकीमध्ये जात धर्मांचा आधार घेतला जातो ते मला पटत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. पक्षाध्यक्षांनी माझ्या उत्तराशी सहमती दर्शवली”, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.

News Title – Nirmala Sitharaman Say I Have Not Money For Election

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्वेना मफाका कोण आहे? वय ऐकून व्हाल थक्क

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच