भन्साळींची बहुचर्चित ‘हीरामंडी’ सीरिज ‘या’ दिवशी होणार रिलीज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Heeramandi | दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रोजेक्ट्सची चाहते आतुरतेने वाट बघत असतात. लवकरच ते त्यांची पहिली वेब सीरिज ‘हिरामंडी’ घेऊन येत आहेत. नेटफ्लिक्ससोबत भन्साळींची कोलॅबरेशन ‘हिरामंडी’ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

‘हिरामंडी’चा फर्स्ट लूक आणि टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना याची जास्तच आतुरता आहे. ‘हिरामंडी’मधील ‘सकल बन’ हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. आता ही सीरिज कधी रिलीज होणार, याची सर्वांना प्रतिक्षा होती. अखेर याची रिलीज डेट समोर आली आहे.

‘हीरामंडी’ सीरिज रिलीज डेट समोर

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मल्टीस्टारर वेब सीरिज ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ (Heeramandi ) ची रिलीज डेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. नुकतीच मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे ‘हीरामंडी’च्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली.

संजय लीला भन्साळी यांची ही बहुप्रतीक्षित वेब सीरिज 1 मे 2024 पासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सोहळ्याला ‘हीरामंडी’ची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल आणि नेटफ्लिक्स इंडिया सीरिजच्या दिग्दर्शिका तान्या बामी यांनी ‘हीरामंडी’च्या रिलीजची तारीख जाहीर केली.

‘हीरामंडी’ सर्वांत महागडी सीरिज

“मी ‘हीरामंडी’ मधून ओटीटी जगात प्रवेश करत आहे. मी इथेही थोडा पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. हीरामंडी हा माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. या सीरिजद्वारे काही खास अनुभव प्रेक्षकांसमोर मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे.”, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय लीला भन्साळी यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

काही मिडिया रिपोर्टनुसार ‘हीरामंडी’ (Heeramandi ) ही ओटीटी जगतातील सर्वात महागडी सीरिज असणार आहे. याचे जवळपास 200 कोटी रुपये बजेट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सीरिजबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.

News Title-  Heeramandi series will release on 1 May 2024

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईच्या संघात ‘राजकारण’! हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’, खेळाडू विभागले

1 एप्रिलपासून बदलणार कर नियम; जाणून घ्या कोणते बदल होणार?

तापमानात वाढ होणार; ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा

हैदराबादच्या खेळाडूंची वादळी खेळी; तोडले कित्येक वर्षांचे रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्वेना मफाका कोण आहे? वय ऐकून व्हाल थक्क