मुंबईच्या संघात ‘राजकारण’! हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’, खेळाडू विभागले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians | मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 3 बाद विक्रमी 277 धावा केल्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करम यांनी स्फोटक खेळी करत धावांचा डोंगर उभारला. त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या उभारून मुंबईला विजयासाठी 278 धावांचे तगडे आव्हान दिले. (IPL 2024 News)

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 3 बाद 277 धावा केल्या. या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने संघर्ष केला पण पाहुण्या संघाला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 6 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 34 चेंडूत 64 धावा केल्या.

हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’

खरं तर हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यापासून मुंबईच्या संघात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. रोहितसारख्या वरिष्ठ खेळाडूला वगळून हार्दिकवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते हार्दिकला ट्रोल करत आहेत. मुंबईचा सलामीचा सामना गुजरात टायटन्सविरूद्ध झाला.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. चाहते ‘रोहित रोहित’ अशा घोषणा देताना दिसले. मुंबईच्या संघात दोन गट पडले असल्याचे अनेकदा दिसले. गुजरातविरूद्धचा सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा नाराज दिसला होता.

Mumbai Indians च्या संघात वाद?

वृत्तसंस्था ‘दैनिक जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सच्या संघात सध्या दोन गट पडले आहेत. माजी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा एका गटात आहेत, तर हार्दिक पांड्या, इशान किशन आणि इतर खेळाडू एका गटात विभागले आहेत. कर्णधार हार्दिकला मुंबईच्या फ्रँचायझीच्या मालकांचा पाठिंबा आहे.

मुंबईला आपले सुरुवातीचे दोन सामने गमवावे लागले आहेत. सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या सामन्यात हार्दिकसेनेचा सनरायझर्स हैदराबादने पराभव केला. हैदराबादच्या फलंदाजांनी जसप्रीत बुमराह वगळता मुंबईच्या सर्व गोलंदाजांची बेक्कार धुलाई झाली.

News Title- Mumbai Indians Controversy news rohit sharma vs hardik pandya atmosphere
महत्त्वाच्या बातम्या –

हैदराबादच्या खेळाडूंची वादळी खेळी; तोडले कित्येक वर्षांचे रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्वेना मफाका कोण आहे? वय ऐकून व्हाल थक्क

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!