Bollywood Actors In Politics l इंडस्ट्रीत खळबळ माजवल्यानंतर कंगना आता राजकीय प्रवास सुरू करणार आहे. भाजपने त्यांना मंडीतून लोकसभा निवडणुकीसाठी उभे केले आहे. त्यामुळे कंगना सतत चर्चेत आहे. कंगनाच्या आधीही कित्येक सुपरस्टार्सनी राजकारणात नशीब आजमावले आहे. या यादीत अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, गोविंदा, रजनीकांत यांच्यासह अनेक सुपरस्टार्सच्या नावांचा समावेश आहे.अनेक सुपरस्टार्सच्या नावांचा समावेश आहे.
Bollywood Actors In Politics l अमिताभ बच्चन :
80 च्या दशकापासून आतापर्यंत दिग्दर्शकांची पहिली पसंती असलेला अभिनेता अमिताभ बच्चन आहे. अमिताभ बच्चनला अभिनयाव्यतिरिक्त आणखी एक मोठी राजकारणाची ऑफर मिळाली होती. त्या काळात राजीव गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी राजकारणात नशीब आजमावल्याचे बोलले जाते. 1984 मध्ये अमिताभ यांनी अलाहाबादमधून निवडणूक लढवली होती, त्यातही ते विजयी झाले होते. मात्र तब्बल तीन वर्षांनी त्यांनी राजकारण सोडले.
धर्मेंद्र :
धर्मेंद्र राजकारणाच्या क्षेत्रातही उतरले आहेत. त्यांनी राजस्थानमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. पण विजयानंतर तो खूपच कमी सक्रिय राहिला. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. कालांतराने त्यांनी राजकारणही सोडले. मात्र, त्यांच्या पत्नी हेमा मालिनी अजूनही राजकारणात आहेत.
Bollywood Actors In Politics l हेमा मालिनी :
हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला आहे. अभिनेत्री अजूनही राजकारणात सक्रिय आहे. यंदा हेमा मालिनी भाजपच्यावतीने मथुरेतून निवडणूक लढवणार आहे.
गोविंदा :
राजकारणाच्या यादीत गोविंदाचे देखील नाव आहे. आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर त्यांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. त्यांनी मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवली आणि विजयी झाले, मात्र 2008 मध्ये ते राजकारणापासून दुरावले आहेत.
सनी देवल :
बॉलीवूडमध्ये बंडखोरी करणाऱ्या सनी देओलने 2014 साली भाजपच्या वतीने निवडणूकही लढवली होती. ते गुदासपूर लोकसभेचे मतदार म्हणून उभा राहिले आणि विजयी देखील झाले आहेत.
थलपथी विजय :
चित्रपटांमध्ये चमत्कार केल्यानंतर आता दक्षिणेतील अभिनेता थलपथी विजयनेही राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी अलीकडेच त्यांच्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे, ज्याचे नाव ‘तमिलगा वेत्री कळघम’ आहे. यासोबतच त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचेही जाहीर केले आहे.
News Title : Bollywood Actors In Politics
महत्त्वाच्या बातम्या :
मुंबईच्या संघात ‘राजकारण’! हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’, खेळाडू विभागले
1 एप्रिलपासून बदलणार कर नियम; जाणून घ्या कोणते बदल होणार?
तापमानात वाढ होणार; ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा
हैदराबादच्या खेळाडूंची वादळी खेळी; तोडले कित्येक वर्षांचे रेकॉर्ड
मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्वेना मफाका कोण आहे? वय ऐकून व्हाल थक्क