हार्दिकच्या चुकीमुळे मुंबईला बसला मोठा फटका; ब्रेट लीने शेअर केला अनुभव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुबंईला पराभवाची (GT vs MI) धूळ चारली तर बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विक्रमी धावसंख्या (SRH vs MI) उभारून ऐतिहासिक विजय मिळवला. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 3 बाद तब्बल 277 धावा केल्या आणि या धावांचा बचाव करताना 31 धावांनी विजय मिळवला. (IPL 2024 News)

मुंबईचा संघ प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयंक अग्रवाल स्वस्तात बाद झाला. पण, त्यानंतर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करम यांनी कहर केला. त्यांनी स्फोटक खेळी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.

ब्रेट लीने शेअर केला अनुभव

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 3 बाद 277 धावा केल्या. या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने संघर्ष केला पण पाहुण्या संघाला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 6 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 34 चेंडूत 64 धावा केल्या.

खरं तर प्रथम गोलंदाजी करताना मुंबईचा कर्णधार हार्दिकची एक चूक संघाला चांगलीच भोवली. त्याने जसप्रीत बुमराहला दोन्ही सामन्यांमध्ये उशीरा गोलंदाजी दिली. पहिल्या सामन्यात हार्दिकने पहिले षटक टाकले, तर दुसऱ्या सामन्यात पदार्पण करत असलेल्या क्वेना मफाकाने डावाची सुरुवात केली. हार्दिकने बुमराहसारख्या स्टार गोलंदाजाला डावलल्याने त्याच्यावर टीका होत आहे.

Hardik Pandya ची चूक भोवली

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने याचाच दाखला देत आपला अनुभव शेअर केला. ब्रेट ली म्हणाला की, जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यात गोलंदाजीला आला तेव्हा गुजरातची धावसंख्या 27/0 अशी होती. हैदराबादविरूद्ध त्याला गोलंदाजीची संधी मिळाली तेव्हा त्यांची धावसंख्या 40/0 होती. त्यामुळे मला वाटते की, बुमराहला पहिले आणि तिसरे षटक द्यायलाच हवे, जेणेकरून मुंबईला पॉवरप्लेमध्ये फायदा होईल. तो एकमेव असा गोलंदाज आहे, जो मुंबईसाठी प्रभावी कामगिरी करू शकतो. ब्रेट ली जिओ सिनेमावर बोलत होता.

मुंबईला आपले सुरुवातीचे दोन सामने गमवावे लागले आहेत. सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या सामन्यात हार्दिकसेनेचा सनरायझर्स हैदराबादने पराभव केला. हैदराबादच्या फलंदाजांनी जसप्रीत बुमराह वगळता मुंबईच्या सर्व गोलंदाजांची बेक्कार धुलाई झाली. मुंबईचा पुढील सामना आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे.

News Title- Brett Lee expressed his displeasure after Mumbai Indians captain Hardik Pandya did not bowl the first over to Jasprit Bumrah
महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ दिग्गज कलाकारांनी अभिनयासोबतच राजकारणातही उमटवलाय विजयाचा ठसा!

मुंबईच्या संघात ‘राजकारण’! हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’, खेळाडू विभागले

1 एप्रिलपासून बदलणार कर नियम; जाणून घ्या कोणते बदल होणार?

तापमानात वाढ होणार; ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा

हैदराबादच्या खेळाडूंची वादळी खेळी; तोडले कित्येक वर्षांचे रेकॉर्ड