माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर ठाकरेंचा गंभीर आरोप!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीमुळे देशात सध्या निवडणूक रोखे प्रकरण चर्चेत आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2019 ते 2024 पर्यंत कोणत्या उद्योगपतीनं किती किमतीचे निवडणूक रोखे खरेदी केले होते आणि ते कोणत्या पक्षाला दिले याची सर्व माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

देशात हे प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्रात ठाकरे गटाने थेट माजी राज्यपालांवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमधील आपल्या एका संस्थेच्या नावावर मुंबईतील उद्योगपतींकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या वसूल केल्या असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. यात त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांचंही नाव घेतलं आहे.

“राजभवन भाजपचा राजकीय अड्डा”

भगतसिंह कोश्यारींनी राजभवन हा भाजपचा राजकीय अड्डा बनवला. अनेक बेकायदेशीर कृत्ये तेथे चालवली गेली. त्यांना मिळालेल्या 15 कोटी रुपयांच्या देणगीचे प्रकरण आता समोर आलं आहे. माहितीच्या अधिकारात अनिल गलगली यांनी माजी राज्यपालांचा भ्रष्ट कारनामा उघड केला.

राज्यपाल असताना कोश्यारी यांनी उत्तराखंडमधील आपल्या एका संस्थेच्या नावावर मुंबईतील उद्योगपतींकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या वसूल केल्या. त्यात सगळ्यात मोठे देणगीदार अंबानी असून कोश्यारी यांनी 15 कोटी रुपये अंबानींकडून घेतले, पण सामाजिक कार्याच्या नावाखाली घेतलेल्या या देणग्यांचा वापर वेगळ्याच कामासाठी झाला. असा गंभीर आरोप आजच्या सामना अग्रलेखातून (Uddhav Thackeray) करण्यात आला आहे.

“कोश्यारींनी अंबानींकडून 15 कोटी रुपये घेतले”

राजभवनात या काळात अनेक पुरस्कार वितरण सोहळे पार पडले. या पुरस्कारांच्या सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात ‘व्यापार’ झाल्याची वदंता तेव्हा सुरू होती. भारतीय जनता पक्षाचे अनेक पुढारी त्या काळात राजभवनातच चटया अंथरून बसत, अशी टीकाही करण्यात आली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांचे एक पुतणे त्या काळात राजभवनात सर्व व्यवहार पाहत होते. राज्यपालांचा वापर करून त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाकडून लूट केली. या लुटीची नोंद राजभवनात आहे काय? राजभवनाचा वापर कोश्यारी काळात दगडी चाळीप्रमाणे झाला व भाजपचे पुढारी हे सर्व अनैतिक काम उघड्या डोळ्यांनी पाहत होते. भाजपला गैरमार्गाने पैसे जमा करण्याचं व्यसन जडलं आहे, पण अशा वसुलीत घटनात्मक पदावरील व्यक्तींना वापरलं जाणे हे चुकीचं आहे, अशी टीका सामनातून (Uddhav Thackeray) करण्यात आली आहे.

News Title : Uddhav Thackeray Faction Slams Ex Governor Bhagatsingh Koshyari  

महत्त्वाच्या बातम्या-

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच

समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा

‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल