या खेळाडूने मुंबई इंडियन्सला घाम फोडून पटकावली ऑरेंज कॅप; किंग कोहलीच काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Orange Cap l आयपीएल 2024 चा उत्साह चाहत्यांना वेड लावत आहे. प्रत्येक सामन्यानंतर चाहत्यांच्या नजरा फलंदाजाच्या ऑरेंज कॅपवर आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्याला ऑरेंज कॅप दिली जाते. स्पर्धेच्या शेवटी ही कॅप सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाते.

IPL 2024 Orange Cap l सनरायझर्स हैदराबादची तुफान खेळी :

आयपीएलच्या 17 व्या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबादने ऐतिहासिक कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या (277/3) केली आहे. मात्र याचे श्रेय ट्रॅव्हिस हेड (62), अभिषेक शर्मा (63) आणि तुफानी खेळी खेळणाऱ्या हेनरिक क्लासेन (80*) यांना मिळाले आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीती क्लासेन नंबर 1 :

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑरेंज कॅपसाठी क्लासेनने पलटनविरुद्ध अवघ्या 34 चेंडूत चार चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 235 च्या आसपास होता. याशिवाय मुंबई इंडियन्सच्या अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा (64) यांनी चांगली खेळी करत ऑरेंज कॅपची शर्यत रोमांचक केली आहे.

किंग कोहली कितव्या स्थानावर?

सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू हेनरिक क्लासेनने अवघ्या 2 सामन्यात 143 धावा करून RCB चा खेळाडू विराट कोहलीला मागे टाकून नंबर 1 स्थान पटकावले आहे. विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीती सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा हा तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा हा चौथ्या स्थानावर आहे.

IPL 2024 Orange Cap l ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप 5 खेळाडू :

हेनरिक क्लासेन (SRH) – दोन सामन्यांत 143 धावा
विराट कोहली (RCB) – दोन सामन्यांत 98 धावा
अभिषेक शर्मा (SRH) – दोन सामन्यांत 95 धावा
तिलक वर्मा (MI) – दोन सामन्यांत 89 धावा
सॅम कुरन (पीबीकेएस) – दोन सामन्यांत 86 धावा

News Title : IPL 2024 : Klaassen Got The Orange Cap

महत्त्वाच्या बातम्या :

‘या’ दिग्गज कलाकारांनी अभिनयासोबतच राजकारणातही उमटवलाय विजयाचा ठसा!

मुंबईच्या संघात ‘राजकारण’! हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’, खेळाडू विभागले

1 एप्रिलपासून बदलणार कर नियम; जाणून घ्या कोणते बदल होणार?

तापमानात वाढ होणार; ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा

हैदराबादच्या खेळाडूंची वादळी खेळी; तोडले कित्येक वर्षांचे रेकॉर्ड